सोन्याच्या तस्करीत विमानतळ कर्मचाऱ्यांचा सहभाग वाढत असून त्यांच्या मदतीने सोन्याची तस्करी केली जात आहे. मंगळवारी हवाई गुप्तचर विभागाने तस्करी करून आणलेले ४८ लाखांचे सोने जप्त केले असून सुरक्षारक्षकासह सोने घेऊन आलेल्या प्रवाशाला अटक केली आहे. दुबईहून आलेला एकप्रवाशी इरफान शेख हा दडवून ९ सोन्याचे बार घेऊन आला होता. मुंबई विमानतळावर उतरल्यावर सुरक्षा तपासणीच्या आधी त्याने सुरक्षा रक्षक प्रजापती याला तीन पाकीटे दिले होते. प्रजापतीने हे पाकीट प्रसाधनगृहाच्या कचराकुंडीत दडवून ठेवले होते. मात्र त्यातील एक पाकीट त्याने स्वत:कडे ठेवले होते. इरफान शेखने याबाबत नंतर प्रजापतीला विचारणा केली आणि त्यांच्यात वाद सुरू झाला. तो प्रकार हवाई गुप्तचर विभागाने पाहिला आणि संशय आल्यानंतर त्या दोघांची चौकशी केली. त्यानंतर सोने तस्करीचा हा प्रकार उघडकीस आला.

Story img Loader