एकनाथ खडसे यांचा राजीनामा होईपर्यंत उपोषण करण्याचा इशारा देत दोन दिवसांपासून समाजसेविका अंजली दमानिया या आझाद मैदानात उपोषणला बसल्या होत्या.
दमानिया यांच्या उपोषणाचीही बहुधा भाजप नेतृत्वाला दखल घ्यावी लागली. खडसे यांनी दिलेला राजीनामा आणि चौकशीची झालेली घोषणा यामुळे आपल्या मागण्या मान्य झाल्याचे दमानिया यांनी सांगितले.
याशिवाय दमानिया यांनी खडसे यांच्या गैरव्यवहाराची आणखी काही प्रकरणे आज उघड केली.