दुसऱ्या गाडीतील तांत्रिक त्रुटी दूर करण्याला प्राधान्य

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावर चालविण्याकरिता मुंबईत दाखल झालेल्या ‘भेल’ कंपनीच्या दुसऱ्या वातानुकूलित (एसी) लोकलमध्ये काही तांत्रिक त्रुटी आढळल्याने त्या दूर करण्यात रेल्वेची यंत्रणा लागली आहे. हे त्रुटी दूर केल्याशिवाय तिसरी वातानुकूलित गाडी मुंबईत आणू नये, अशी विनंती पश्चिम रेल्वे प्रशासनाने रेल्वे मंडळाला केल्याने तिसऱ्या गाडीचे आगमन लांबले आहे.

‘भेल’ कंपनीने विकसित केलेली  एक गाडी मे महिन्यात मुंबईला आली. या गाडीच्या मध्य आणि पश्चिम रेल्वेवर चाचण्या घेण्यात आल्या; परंतु ही गाडीही मध्य रेल्वेऐवजी पश्चिम रेल्वे मार्गावरच चालविता येणार आहे. याशिवाय या गाडीत काही तांत्रिक दोषही आढळून आले आहेत. त्यामुळे या गाडीपाठोपाठ येणारी तिसरी गाडी तूर्तास पाठविण्यात येऊ नये, असे रेल्वे प्रशासनाने रेल्वे मंडळाला कळविले आहे.

चेन्नईतील ‘आयसीएफ कोच फॅक्टरी’मध्ये या गाडय़ांची बांधणी करण्यात येत आहे; परंतु या गाडीचे आगमन लांबल्याने आणि आधीच्या गाडीतील तांत्रिक दोष दूर करण्याचे काम असल्याने सध्या तरी मुंबईकरांना एकाच वातानुकूलित गाडीवर समाधान मानावे लागेल.

उपनगरीय मार्गावर वातानुकूलित लोकल चालविण्यात नेमक्या काय अडचणी आहेत, याची माहिती देण्यात आली होती. तरीही काही त्रुटी कायम आहेत. नवीन गाडय़ांची निर्मिती करताना हे दोष का दूर झाले नाहीत, असा प्रश्न आहे. वातानुकूलित लोकलच्या दरवाजा स्वयंचलित आहे. मात्र तो उघड-बंद होण्याच्या यंत्रणेत उणिवा आहेत. यासाठीचे सॉफ्टवेअर योग्य प्रकारे काम करत नाही. प्रवासी माहिती व्यवस्थेमध्येही त्रुटी असल्याचे निदर्शनास आले आहे. हे दोष नव्या गाडीतही कायम आहेत.