मुंबई : न्यूझीलंड सोसायटी ऑफ ऑथर्स या संस्थेच्यावतीने दरवर्षी अप्रकाशित कथा-कादंबऱ्यांसाठी देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठित मायकेल गिफ्किन्स पुरस्कारांची नामांकन यादी जाहीर झाली आहे. एकूण १३ जणांच्या या यादीत भारतीय लेखिका श्रिया भागवत यांच्या ‘अ‍ॅन इन्टरगेशन ऑफ चॉईसेस’ या कथासंग्रहाचा समावेश आहे. या पुरस्कारांच्या नामांकन यादीत स्थान मिळवणाऱ्या श्रिया या एकमेव भारतीय लेखिका आहेत. मायकेल गिफ्किन्स पुरस्कारांच्या नामांकन यादीत निवड होणे हा आनंदाचा धक्का आहे, अशा शब्दांत श्रिया यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

न्यूझीलंड येथील प्रसिद्ध लेखक, समीक्षक, प्रकाशक आणि संपादक मायकेल गिफ्किन्स यांच्या नावाने देण्यात येणारा हा पुरस्कार प्रामुख्याने अप्रकाशित कथा-कादंबऱ्यांसाठी दिला जातो. २०१८ पासून हा पुरस्कार दिला जातो आहे. यंदा या पुरस्कारासाठी ४९ साहित्यिकांचे अर्ज आले होते. त्यातून १३ जणांची नामांकन यादी तयार करण्यात आली असून यात लेखिका श्रिया भागवत यांच्या ‘अ‍ॅन इन्टरगेशन ऑफ चॉईसेस’ या कथासंग्रहाचा समावेश आहे. मुंबईतील विलेपार्ले येथील श्रिया गेली काही वर्ष न्यूझीलंड येथे वास्तव्याला आहे. तिथे त्या कम्युनिकेशन क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘माझी नोकरी सांभाळून लिखाणाची आवड मी जपली आहे. गेली कित्येक वर्ष पहाटे  आणि संध्याकाळी कामावरून परत आल्यानंतर रोज न चुकता लेखन करायचे हा माझा शिरस्ता राहिला आहे. साहित्य, नाटकासाठी कथालेखन आणि पटकथा लेखनही मी याआधी केलेले आहे. न्यूझीलंड सोसायटी ऑफ ऑथर्स या मान्यवर साहित्यिक संस्थेचीही मी सभासद आहे,’ असे श्रिया यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

हेही वाचा >>> दाऊदी बोहरा उत्तराधिकारी वादावर उच्च न्यायालय आज निर्णय देणार, प्रदीर्घ सुनावणीनंतर गेल्या वर्षी निर्णय राखून ठेवला होता

न्यूझीलंड येथील प्रसिद्ध लेखक, समीक्षक, प्रकाशक आणि संपादक मायकेल गिफ्किन्स यांच्या नावाने देण्यात येणारा हा पुरस्कार प्रामुख्याने अप्रकाशित कथा-कादंबऱ्यांसाठी दिला जातो. २०१८ पासून हा पुरस्कार दिला जातो आहे. 

कथा संग्रहाची वैशिष्टय़े

‘अ‍ॅन इन्टरगेशन ऑफ चॉईसेस’ या कथासंग्रहात वीस कथा आहेत. नवरसांवर आधारित या कथा असून बीभत्स, भय आणि राग या भावनांवर जोर देणाऱ्या अधिक कथा असल्याचे त्यांनी सांगितले. साधारणत: या रसांबद्दल बोलणे वा या भावना चारचौघात व्यक्त करणे आपण टाळतो. तोच धागा पकडून मी या भावरसांचा अधिक सखोल वेध घेत या कथा लिहिल्या आहेत. दहा महिन्यांपूर्वी मला मायकेल गिफ्किन्स पुरस्कारांची माहिती मिळाली. माझ्या कथांचे हस्तलिखित तयार असल्याने मी या पुरस्कारांसाठी अर्ज केला. प्रस्थापित, अनुभवी लेखकांकडून आपल्या लेखनाला मान्यता मिळणे हा अनुभव आनंददायी आणि प्रोत्साहन देणारा आहे, असे श्रिया यांनी सांगितले. माझ्या या सतत सर्जनशील लेखनाच्या प्रयत्नातूनच मला ‘मायकेल किंग रायटर्स सेंटर रेसिडेन्सी २०२२’ या प्रकल्पात सहभागी होण्याची संधी मिळाली होती. या प्रकल्पांतर्गत काम करत असताना मी ‘अ‍ॅन इन्टरगेशन ऑफ चॉईसेस’ या कथासंग्रहातील कथांचे लेखन केले. मान्यवर लेखकांच्या मार्गदर्शनाखाली स्वत:ची लेखनशैली विकसित करण्याची संधी मला या प्रकल्पांतर्गत मिळाली, त्याचा या कथासंग्रहासाठी मला खूप फायदा झाला. – श्रिया भागवत, लेखिका

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Writer shriya bhagwat name shortlisted for michael gifkins prize mumbai print news zws
Show comments