मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील दोषी याकूब मेननला फाशी दिल्यानंतर त्याच्या मृतदेहाचे दफन मुंबईत होणार आहे. त्या पाश्र्वभूमीवरील परिस्थिती हाताळण्यासाठी तसेच कायदा-सुव्यवस्था हाताळण्यासाठी मुंबई पोलिसांनी व्यूहरचना केली आहे. बुधवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या काळात पोलिसांच्या रजा रद्द करण्यात आल्या असून प्रतिबंधात्मक कारवाई करून समाजकंटकांना अटक केली जाणार आहे. १९९३ साली मुंबईत झालेल्या भीषण बॉम्बस्फोट खटल्यातील दोषी याकूब मेमनला ३० जुलै रोजी फाशी देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. मेमन याचे घर मुंबईतल्या माहीम आणि डोंगरी येथे आहे. फाशी दिल्यानंतर त्याचे दफन या दोन्हीपैकी एका ठिकाणी होणार आहे.

Story img Loader