मुंबईत रेल्वे ट्रॅक ओलांडू नका असं आवाहन वारंवार रेल्वेकडून केलं जातं. त्यासाठी विविध जाहिराती, जनजागृती करणारे फलकही लावले जातात. तरीही अनेक प्रवासी रेल्वे रुळ ओलांडतातच. अशा प्रवाशांना आळा घालण्यासाठी पश्चिम रेल्वेने एक खास मोहीम राबवली. रेल्वे रुळ ओलांडणाऱ्या प्रवाशाला उचलून आणणारा यमराजच त्यांनी अंधेरी स्थानकात आणला. हा यमराज लोकांना उचलून ट्रॅकवर आणून ठेवत होता. त्यांना कधी उठाबशा काढायला लावत होता तर कधी समज देऊन सोडत होता. रेल्वे रुळ ओलांडलात तर तुमची भेट थेट यमराजाशी म्हणजेच मृत्यूशी होईल त्यामुळे असं करु नका हे आवाहन त्यांने प्रवाशांना केलं.
“यह यमराज रखते हैं नजर और जान बचाते हैं”! पटरी पार करने के खतरों के प्रति लोगों को जागरूक करने के लिए @rpfwrbct द्वारा चलाए जा रहे अभियान के अंतर्गत यात्रियों को पटरी पार करने से रोकने के साथ ही उन्हें पुल/सबवे के उपयोग के लिए प्रेरित किया जा रहा है। pic.twitter.com/WxB7MTnrvc
आणखी वाचा— Western Railway (@WesternRly) November 7, 2019
पश्चिम रेल्वेने एका आरपीएफच्या जवानाला यमाच्या वेशात अंधेरी स्थानकात आणण्यात आलं होत. हा जवान रेल्वे ट्रॅक क्रॉस केल्याने काय संकटं ओढवू शकतात हे लोकांना सांगत होता. त्यांना थेट उचलून प्लॅटफॉर्मवर आणत होता. पश्चिम रेल्वेने ही आगळीवेगळी मोहीम जनजागृतीसाठी राबवली. लोकांना उचलून आणून यमराज त्यांना पूल किंवा सबवे वापरा असा सल्ला देत होता.
पश्चिम रेल्वे मार्गावर असलेल्या अंधेरी, मालाड, गोरेगाव या स्थानकांदरम्यान रेल्वे ट्रॅक क्रॉस केला तर उचलेल यमराज ही मोहीम राबवण्यात आली. अनेकदा पाट्या, फलक लावून घोषणा करुनही प्रवासी ट्रॅक क्रॉस करतात. या घटनांमध्ये अनेकदा लोकांचा जीव जातो किंवा अनेक लोक जखमी होतात. प्रसंगी प्रवाशांचा मृत्यूही होतो. हे सगळं टाळावं म्हणून पश्चिम रेल्वेने ही आगळीवेगळी मोहीम राबवली.