पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील देशोदेशींचे चित्रपट मुंबईकरांनाही पाहायला मिळावेत म्हणून गेल्या दोन वर्षांपासून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू करण्यात आला असून तिसऱ्या महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी संध्याकाळी पाच वाजता केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. १९ ते २५ जानेवारीदरम्यान यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील चित्रपट मुंबईकरांना पाहायला मिळणार असून पोलंडचा ‘रोझो’ या चित्रपटाने महोत्सवाचे उद्घाटन केले जाणार आहे. यंदाच्या महोत्सवात ‘कंट्री फोकस’ विभागात हंगेरीचे चित्रपट दाखविण्यात येणार असून ‘धग’ या मराठी चित्रपटाबरोबरच विविध देशांतील सुमारे दीडशे चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. महोत्सवाची प्रतिनिधी नोंदणी सुरू झाली असून विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिकांना यामध्ये सवलत देण्यात येत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा