मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्या घरी शुक्रवारी सकाळी प्राप्तिकर विभागानं छापा घातला आहे. आयकर विभागाकडून त्यांच्या माझगाव येथील घरी चौकशी सुरु आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्षांच्या घरी ही कारवाई झाल्याचे बोलले जात आहे. यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली असून शिवसैनिकांनी अनुचित प्रकार करू नये असे आवाहन त्यांनी केले आहे.

“प्राप्तिकर विभागाची धाड पहिल्यांदा पडत आहे अशातला भाग नाही. या सगळ्या संस्थ्या संविधानाला मानून काम करत आहेत. त्यांना जी माहिती हवी आहे ती स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव हे नक्की देतील. शिवसैनिकांनी अनुचित प्रकार करू नये म्हणून मी या ठिकाणी आले आहे. यशवंत जाधव या धाडीला हवी ती उत्तरे देतील,” असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

News About Parliament
BJP : उपराष्ट्रपती व्ही. पी. धनखड यांना हटवण्यासाठी विरोधकांचा गोंधळ, भाजपाने नेमकी काय खेळी केली?
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Manoj Jarange On Santosh Deshmukh Case
Santosh Deshmukh Case : “आरोपींना मोकाट फिरू देणार असाल तर…”, मनोज जरांगेंची सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया
massive agitation organised against mla bhaskar jadhav in vikas jadhav attack case
हल्ल्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विकास जाधव आक्रमक, आमदार भास्कर जाधवांविरोधात विराट मोर्च्याचे आयोजन
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान
Prime Minister announces free elections in Syria
सीरियात असादपर्वाची अखेर सत्ता उलथवण्यात बंडखोरांना यश; पंतप्रधानांची मुक्त निवडणुकांची घोषणा
Maharashtra Assembly Elections 2024 Narendra Modi BJP MVA
‘गुजरात मॉडेल’चा महाराष्ट्रात पायरव…
Hasan Mushrif f
चूक भाजपाची अन् माफी मुश्रीफांना मागावी लागली, नेमकं प्रकरण काय? म्हणाले, “आमच्या मनातही…”

उद्धव ठाकरे व सोनिया गांधी दोघांसाठी आर्थिक अफरातफर करणारी व्यक्ती एकच; किरीट सोमय्यांचा आरोप

“आज तुम्ही ज्या पद्धतीने यंत्रणांचा वापर करत आहात ते मुंबई आणि महाराष्ट्र बघत आहे. जिथे भाजापाची सत्ता नाही तिथे हा त्रास होत आहे. हा त्रास होत आहे म्हणून आम्ही घरात घाबरुन बसणार नाही. जे आहे ते तुम्हाला दाखवू. हे सर्व दुधाने धुतलेले आहेत आणि शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एवढेच बरबटलेले आहेत हे त्यांचे म्हणणे आहे. आम्ही कायदा मानतो आणि त्यानुसार ही पाहणी आहे. यशवंत जाधव याला उत्तर देतील. त्यामुळे उगाचच वातावरण बिघडू नका,” असे महापौर म्हणाला.

“सगळं स्पष्ट होऊन आपल्या समोर येणार आहे. त्याआधीच लंकेला आग लावावी तसे हे सगळ बोंबलत चालले आहेत. या यंत्रणा दोन्ही बाजूने वापरता येतात. निवडणुकीच्या तोंडावर आणि सत्ता गेल्यापासून बुडाला आग लागली आहे हे महाराष्ट्र आणि मुंबई बघत आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी कुठलाही अनुचित प्रकार करु नका. आधी शिवसैनिक असलेल्या छगन भुजबळांनाही चिवटपणे लढा दिला. त्यांना दोन वर्षे मनस्ताप भोगावा लागला. पण नंतर त्याच कोर्टाने त्यांना क्लीन चीट दिली,” असेही किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

दरम्यानस, यशवंत जाधव आणि त्यांच्या पत्नी आमदार यामिनी जाधव यांनी कोलकाता येथील शेल कंपन्यांमध्ये आर्थिक व्यवहार केल्याचं प्राप्तिकर विभागाच्या याआधीच्या तपासात उघड झाल्याचे म्हटले आहे. यापूर्वी प्राप्तिकर विभागानं केलेल्या तपासात कोलकाता येथील शेल कंपन्यांद्वारे झालेल्या आर्थिक व्यवहारांमध्ये शिवसेना आमदार यामिनी जाधव आणि त्यांचे पती यशवंत जाधव, तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी पैसे कमावल्याचा दावा करण्यात आला होता.

Story img Loader