“कालच्या सभेला ते म्हणत होते मास्टरसभा मास्टरसभा पूर्ण भाषण ऐकल्यानंतर आमच्या लक्षात आलं लाफ्टर सभा लाफ्टर सभा. कौरवांची सभा काल झाली पांडवांची सभा आज होत आहे.” असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल झालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेवर निशाणा साधला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तसेच, “काल छत्रपती संभाजी महाराजांची देखील जयंती होती आणि भगवान नृसिंहाची देखील जयंती होती. स्वराज्याच्या रक्षणासाठी लढणारे छत्रपती संभाजी महाराज आणि ज्यांनी पापींचं पोट फाडलं असे भगवान नृसिंह या दोघांची काल जयंत होती. आम्हाला वाटलं काही तेजस्वी, ओझस्वी ऐकायला मिळेल. काहीतरी असं बोललं जाईल की जे ऐकूण आम्ही हलून जाऊ. मात्र लाफ्टर शो शेवटपर्यंत संपलाच नाही. त्याच गोष्टी आम्हाला ऐकायला मिळाल्या. एकही नवीन गोष्ट आम्हाला ऐकयला मिळाली नाही.” असंही फडणवीसांनी बोलून दाखवलं.

याचबरोबर, “कालच्या भाषणात आमचे एक मित्र सांगत होते, शंभर सभांची बाप सभा. खरंच आहे १०० कोणासोबत होते? कौरवांसोबत होते. पांडवासाोबत पाच होते. कौरवांची सभा काल झाली पांडवांची सभा आज होत आहे.” असंही यावेळी फडणवीस म्हणाले.

“मी तुम्हाला काही प्रश्न विचारू इच्छितो मला उत्तर द्या, मुंबईत कोविड काळामध्ये भ्रष्टाचार झाला की नाही? दीड लाख लोकांचा मृत्यू झाला की नाही?, पालघरमध्ये साधूंची हत्या झाली की नाही?, वसूलीच्या आड येणाऱ्यांना मनसूख हिरेन बनलं की नाही?, १०० कोटींच्या वसूलीसाठी गृहमंत्री तुरुंगात गेले की नाही?, दाऊदचा मित्र असूनही मंत्रिमंडळात आहे की नाही?, आपल्या मजूर- कामगार बांधवांना अणवानी पायांनी मुंबई सोडावी लागली की नाही?, मुंबईत मेट्रो, रस्त्यांची कामे बंद आहेत की नाही?, यशवंत जाधवची संपत्ती वाढली की नाही? आता मला सांगा एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतरही यापौकी एकाही गोष्टीवरही आपले मुख्यमंत्री बोलले का? आपले मुख्यमंत्री राज्याचे आणि देशातील पहिले मुख्यमंत्री असतील, की अडीच वर्षांमध्ये या महाशयांनी एकही भाषण राज्याच्या विकासावर दिलं नाही, राज्याच्या विषयावर, लोकांच्या समस्येवर दिलं नाही.” असंही फडणवीसांनी यावेळी सांगितलं.

“आताच आपण हनुमान चालीसा पठण केली. हनुमान चालीसा तर आमच्या हृदयात असते. परंतु हे जे रवी राणा, नवनीत राणा आहेत ना यांना समजतच नाही, की हनुमान चालीसेच्या दोन ओळी उद्धव ठाकरे आणि या सरकारला अगोदरपासूनच माहीत आहेत आणि केवळ त्या दोन ओळींवरच ते काम करत आहेत. कोणत्या दोन ओळी, राम दुआरे तुम रखवारे होत न आज्ञा बिन पैसा रे… यामुळेच २४ महिन्यात ५३ मालमत्ता तयार झाल्या आणि यशवंत जाधवांनी आपल्या मातोश्रींना ५० लाखांचं घड्याळ देखील दिलं.माझा प्रश्न आहे की हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी कधी विचार केला असेल का? की त्यांच्या मुलाच्या राज्यात हनुमान चालीस म्हणणं राजद्रोह असेल आणि औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकवणं हा राजशिष्टाचार असेल, त्यांनी कधी विचार केला असेल का?” असं म्हणत फडणवीसांनी टीका केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल(शनिवार) मुंबईत बीकेसीमध्ये घेतलेल्या जाहीर सभेत भाजपासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनेसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधल्याचे दिसून आले. विविध मुद्य्यांवरून उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. यानंतर आज(रविवार) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये हिंदी भाषी महासंकल्प सभा झाली. या सभेची सुरूवात सामूहिक हनुमान चालीसा पठणाने झाली. फडणवीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं.

या सभेसाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपा आमदार आशिष शेलार, आमदार अतुल भातखळकर, आमदार मंगलप्रभात लोढा, कृपाशंकर सिंह, संजय उपाध्याय, राजन सिंग, खासदार गोपाल शेट्टी, खासदार, मनोज कोटक, आमदार प्रसाद लाड, आमदार विद्या ठाकूर, आमदार जयप्रकाश ठाकूर आदीसंह भाजपा नेते, पदाधिकारी उपस्थित होते.