आम आदमी पक्षातील बंडखोर नेते योगेंद्र यादव, प्रशांत भूषण व अन्य नेत्यांनी नव्या पक्षाच्या स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांची जमवाजमव सुरू केली आहे. केंद्रातील भाजप सरकारला व दिल्लीतील केजरीवाल सरकारला शह देण्यासाठी भ्रष्टाचार, जातीय अत्याचार, शेतकरी-शेतमजुरांच्या प्रश्नांवर जनआंदोलन उभे करण्याची तयारी सुरू आहे, अशी माहिती स्वराज्य अभियानाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य ललित बाबर यांनी दिली.
दिल्लीतील अभूतपूर्व यशानंतर आपमध्ये नेतृत्वावरून संघर्ष सुरू झाला. आपचे निमंत्रक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुरोगामी-धर्मनिरपेक्ष चेहरा असलेल्या योगेंद्र यादव, प्रशांत भूषण आदींची पक्षातून हकालपट्टी केली. त्यामुळे पक्षात दोन गट पडले.
आपशी संबंध संपुष्टात आल्यानंतर, यादव, भूषण यांनी स्वराज्य अभियान नावाने भ्रष्टाचार व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स्वतंत्र चळवळ सुरू करण्याचे ठरविले. दलित समाजाला सोबत घेण्यासाठी जातीय अत्याचाराचा प्रश्नही अभियानाच्या अजेंडय़ावर घेण्यात आला आहे. योगेंद्र यादव यांनी अलीकडेच राज्याचा दौरा करून प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन नव्या पक्ष स्थापनेमागची भूमिका स्पष्ट करून सांगितली.
बंडखोर ‘आप’ नेत्यांचीनव्या पक्षासाठी जमवाजमव
आम आदमी पक्षातील बंडखोर नेते योगेंद्र यादव, प्रशांत भूषण व अन्य नेत्यांनी नव्या पक्षाच्या स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 22-06-2015 at 04:04 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yogendra yadav prashant bhushan movement for the establishment of new party