लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : भांडुप परिसरात एका तरुणाने शुक्रवारी स्वतःवर बंदुकीने गोळी झाडून आत्महत्या केली. याप्रकरणी भांडुप पोलिसांनी घटनेची नोंद करून तपास सुरू केला आहे.
भांडुपच्या एकता नगर परिसरात शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास ही घटना घडली आहे. येथे वास्तव्यास असलेला साहिल कुरेशी याच्याकडे बेकायदेशीर देशी बनावटीची बंदूक होती. याच बंदुकीने त्यांनी स्वतःवर एक गोळी झाडून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच भांडुप पोलिसांनी तात्काळ एकता नगर परिसरात धाव घेतली. भांडुप पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवला असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.