कोपर रस्ता अंबामाता मंदिर भागात राहणाऱ्या पूजन दीनानाथ शुक्ला (वय २८) या तरुणाने आपल्या मुलीवर गेली तीन वर्षे बलात्कार करून तिच्याजवळील ऐंशी हजार रुपयाचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत, अशी तक्रार पीडित मुलीच्या आईने विष्णुनगर पोलीस ठाण्यात केली आहे. त्याला अटक करण्यात आली आहे.  सोळा वर्षांच्या मुलीला पूजन शुक्ला आपली फसवणूक करीत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तिने गुन्हा दाखल केला.