लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : विभक्त राहणाऱ्या पहिल्या पत्नीसोबत प्रेमविवाह करणाऱ्या ३८ वर्षीय तरुणावर पतीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना गोवंडीच्या शिवाजी नगर परिसरात घडली. याबाबत शिवाजी नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

case filed against entertainment company owner for unpaid dues of 1 25 crore rupees
कौटुंबिक वादातून महिलेवर चाकूने वार करुन पतीचा आत्महत्येचा प्रयत्न; बाणेर भागातील हाॅटेलमधील घटना
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Wife can file case of molestation against husband
पत्नी पतिविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करू शकते
man killed wife due to suspicion of having an immoral relationship
नागपूर : प्रेमविवाहाचा करुण अंत! अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीचा खून
Delisa Perera
वसईतील डॉक्टर डेलिसा परेरा यांची आत्महत्या; आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक
suicide in barabanki uttar pradesh
“अधुरी एक कहाणी…”, पत्नीच्या कुटुंबीयाच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या; फेसबूकवर लिहिली सुसाईड नोट!
thane woman suicide latest news in marathi
ठाणे : सासरच्यांच्या त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या
Nagpur,couple made video before committing suicide on their wedding anniversary
नागपूर : लग्नाच्या वाढदिवशीच दाम्पत्याची आत्महत्या, अपत्य होत नसल्यामुळे…

हुसेन शेख असे आरोपीचे नाव असून तो गोवंडीच्या शिवाजी नगर परिसरात वास्तव्याला आहे. वर्षभरापूर्वी त्याने पहिल्या पत्नीला सोडून दुसरा विवाह केला होता. त्यामुळे त्याची पहिली पत्नी एकटीच विभक्त राहत होती. याचदरम्यान तिची युनूस शेख (३८) यांच्यासोबत ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर दोघांनी लग्न केले. ही बाब हुसेनला समजताच तो प्रचंड संतापला.

आणखी वाचा-मुंबई : जे. जे. रुग्णालयात उभे राहणार देशातील पहिले वैद्यकीय संग्रहालय

युनूस सोमवारी रात्री गोवंडीच्या रफिक नगर परिसरातून जात असताना हुसेनने त्याला रस्त्यात गाठले. यावेळी दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर हुसेनने चाकूने युनूसवर अनेक वार केले. गंभीर अवस्थेत युनूस रस्त्यात पडला होता. अखेर काही नागरिकांनी त्याला गोवंडीतील शताब्दी रुग्णालयात दाखल केले. शताब्दी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात युनूसवर उपचार सुरू आहेत. शिवाजी नगर पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल करून हुसेनला अटक केली.

Story img Loader