मुंबई : सीएसएमटी रेल्वे स्थानकातील शौचालायत १८ वर्षीय तरुणीने गुरुवारी आत्महत्येचा प्रयत्न केला. या तरुणीवर सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती आता स्थिर आहे. मेहक गांधी (१८) असे संबंधित तरुणीचे नाव आहे.

ही तरुणी गुरुवारी दुपारी १ च्या सुमारास सीएसएमटी स्थानकातील शौचालयात गेली. शौचालायत तिने धारधार शस्त्राने स्वतःला जखमी केले. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच, जखमी तरुणीला उपचारासाठी नजीकच्या सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही तरुणी ठाणे जिल्ह्यातील कासारवडवली येथे वास्तव्यास आहे. तिची प्रकृती स्थिर असून तिच्यावर पुढील उपचार सुरू आहेत.

Story img Loader