‘व्हॅलेन्टाइन डे’च्या दिवशीच प्रेयसीवरील वादावरून मुंबईच्या दादर परिसरात सख्या मोठ्या भावाला आपला जीव गमवावा लागल्यामुळे या परिसरात खळबळ माजली आहे. जीतूराज गोस्वामी (४० वर्षे) आणि नवीन गोस्वामी (२१ वर्षे) हे दोघे सख्खे भाऊ रानडे रोडवर आईस्क्रिम पार्लर चालवतात. काल (गुरूवार) रात्री अकरा वाजताच्या सुमारास जीतूराज आणि नवीन यांच्यात झालेल्या भांडणामध्ये जीतूराजने नवीनच्या प्रेयसीला शिव्या दिल्या. त्यानंतर संतप्त झालेल्या नवीनने आईसक्रीम कापण्याच्या चाकूने आपला मोठा भाऊ जीतूराजची हत्या केली. त्यानंतर शिवाजी पार्क पोलीसांनी नवीनला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 14-02-2014 at 04:09 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Younger brother killed elder brother in dadar