एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने तरुणीवर रविवारी दुपारी तिच्या घरात घुसून चाकूने हल्ला केला. या तरुणीची प्रकृती गंभीर आहे. तरुणाला नागरिकांनी पकडून वर्तकनगर पोलिसांच्या ताब्यात दिले.
पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी सांगितले की, विनय साळवी (१७) असे अटक आरोपीचे नाव आहे. तो नालासोपारा येथे राहतो. विनय एकतर्फी प्रेम करीत असलेली तरुणी ठाण्यातील सावरकरनगर भागात राहते. तरुणी इयत्ता ११ वीत शिक्षण घेत आहे. विनय व ही तरुणी कोकणातील वैभववाडी येथील रहिवासी आहेत. गावात त्यांची शेजारी घरे आहेत. विनयने या तरुणीला गेल्या वर्षी लग्नासाठी मागणी घातली होती. तरुणीने त्यास नकार देऊन विनयशी बोलणे बंद केले होते. त्यानंतर विनयने तरुणीला बघून घेण्याची धमकी दिली होती. हा प्रकार तरुणीने आपल्या घरी सांगितला नव्हता.

Story img Loader