भररस्त्यात एका तरुणाने स्वत:वर कोयत्याचे वार करून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी परळच्या हाफकीन संस्थेजवळ घडली. मयत तरुणाची ओळख मात्र पटू शकलेली नाही. दुपारी साडेतीनच्या सुमारास अंदाजे २५ वर्ष वयाच्या या तरुणाने आचार्य दोंदे मार्गावर हाफकीनजवळील एक नारळ विक्रेत्याकडून कोयता हिसकून घेतला आणि स्वत:वर वार करून घेतले. भर रस्त्यात घडलेल्या या प्रकाराने एकाच खळबळ उडाली. जखमी अवस्थेतील या तरुणाला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या तरुणाची ओळख पटलेली नसून त्याने अंमली पदार्थाचे सेवन केले असावे आणि त्या नशेच्या अंमलातच त्याने स्वत:वर वार करून घेतले असावेत, असे भोईवाडा पोलिसांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा