मुंबई: श्वानाने केलेल्या हल्ल्यात एका तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना विक्रोळीत घडली असून सदर तरुण श्वानाचा सांभाळ करण्याचे काम करीत होता. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

विक्रोळी परिसरात वास्तव्यास असलेला असरत अली (२२) हा आठ महिन्यांपूर्वी श्वानांना प्रशिक्षण देणाऱ्या एका कंपनीत नोकरीला लागला होता. तो श्वानांना सांभाळण्याचे काम करीत होता. विक्रोळी परिसरात ग्रेट डेन जातीच्या श्वानाला सांभाळण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. या श्वानाने सोमवारी त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात असरत गंभीर जखमी झाला. त्याच्या इतर सहकाऱ्यांनी त्याला तत्काळ घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.असरतच्या एका नातेवाईकाच्या तक्रारीवरून विक्रोळी पोलिसांनी श्वानांना प्रशिक्षण देणाऱ्या कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Crime NEws
कुवैतहून थेट मध्य प्रदेश गाठलं अन् मुलीवर लैंगिक शोषण करणाऱ्याचा घेतला जीव; मृत्यूचं गुढ उकलायला वडिलांनीच केली मदत!
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
nana patole
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजेच ‘ऑपरेशन लोटस’,पटोलेंचा घणाघात
account wise inquiry started against clerk in case of corruption in Jijamata Hospital of Municipal Corporation in Pimpri
पिंपरी : जिजामाता रुग्णालयातील रकमेचा अपहार; लिपिकाची खातेनिहाय चौकशी
Satish wagh murder case, Pune police,
सतीश वाघ हत्या प्रकरण : आरोपींच्या शोधासाठी पुणे पोलिसांची १६ पथके रवाना
Thane dog, floor thrown dog feet, damage bike,
ठाणे : दुचाकीचे नुकसान झाल्याने श्वानाच्या पायावर फरशी टाकली
stray dogs attack on small boy
कल्याणमध्ये भटक्या श्वानाचा शाळकरी मुलावर हल्ला
Mysterious flu like Disease X
आणखी एका महासाथीचा धोका? आतापर्यंत ७९ जणांचा मृत्यू; काय आहे ‘Disease X’?
Story img Loader