मुंबई: राज्यातील १८ ते १९ या वयोगटातील ४३ लाख मतदारापैकी ८ लाख तर २० ते २१ वयोगटातील दोन कोटी २८ लाख पात्र मतदारापैकी एक कोटी ६४ मतदारांनी ३० एप्रिल २०२३ पर्यंत नोंदणी केली होती. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या पुनरीक्षण कार्यक्रमामुळे राज्यातील तरुणाईत मतदार नोंदणीत उदासीनता असल्याचे वास्तव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर निवडणूक आयोगाने एक जानेवारी २०२४ या तारखेला पात्र होणाऱ्या नागरिकांसाठी मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे.राज्यात ३० एप्रिल २०२३ अखेर १८ ते १९ वयोगटातील ४२ लाख, ९८ हजार ७५६ मतदारांपैकी प्रत्यक्ष नोंद ८ लाख ३५ हजार ८८३ , २० ते २९ वयोगटात दोन कोटी २८ लाख ५४ हजार ६९३ पैकी प्रत्यक्ष नोंद एक ६४ लाख पाच हजार १८१ जणांनी केली. तर ३०-३९ वयोगटात दोन कोटी १५ लाख ६० हजार ६४३ पैकी प्रत्यक्ष नोंद दोन कोटी पाच लाख ४४ हजार ४८० जणांनी नोंद केली आहे. ३० एप्रिल २०२३ पर्यत नोंद असलेले एकूण मतदार ९ कोटी ३ लाख २ ६२ इतक्या मतदारांची नोंद झालेली आहे. पुनरिक्षण कार्यक्रमामध्ये मतदार वाढ अपेक्षित आहे.

निवडणुका पारदर्शक आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण अत्यंत महत्त्वपूर्ण असते. १७ ऑक्टोबर, २०२३ रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये प्रारूप यादी प्रकाशित केली जाईल. मतदारांनी आपले नाव, पत्ता, लिंग, जन्मदिनांक, वय, ओळखपत्र क्रमांक, मतदारसंघ इ. तपशील मतदार यादीत तपासून ते अचूक आहेत का याची खात्री करणे आवश्यक आहे.

१७ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर हा कालावधी मतदार नोंदणीचा तसेच नावासंबंधी काही हरकती असल्यास हरकती घेण्याचा आहे, असे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youth in the state depressed in voter registration mumbai amy
Show comments