नौपाडा येथील आंबेडकर रोड भागात राहणाऱ्या एका २६ वर्षीय तरुणावर अनोळखी व्यक्तीने रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडल्याचा प्रकार गुरुवारी रात्री घडला असून यात तरुण जखमी झाला आहे. त्याच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्यामागचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
जखमी झालेल्या तरुणाचे नाव सुनील जाधव असे आहे. तो इस्टेट एजंटचे काम करतो. नेहमीप्रमाणे तो गुरुवारी रात्री राहत्या घरासमोरील गल्लीमध्ये दारू पीत बसला होता. त्यावेळी अनोळखी व्यक्तीने रिव्हॉल्व्हरमधून त्याच्यावर गोळी झाडली. ही गोळी त्याच्या तोंड व मानेतून आरपार होऊन खांद्यामध्ये घुसल्याने तो जखमी झाला आहे. अंधाराचा फायदा घेऊन हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी ठरले. या घटनेनंतर त्याच्या कुटुंबीयांनी धाव घेऊन त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Story img Loader