मुंबई : चेंबूरजवळील माहुल गावामधील एका घरात गुरुवारी दुपारी स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाला असून या दुर्घटनेत एक तरुण गंभीर जखमी झाला. या तरुणावर शीव रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेत घरातील सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

माहुल गावातील दत्त निवास चाळीत राहणाऱ्या सुरेंद्र पाटील यांच्या घरात गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरमधून गळती होत असल्याने हा स्फोट झाला. यावेळी घरात सुरेंद्र पाटील यांचा मुलगा आर्या पाटील (१९) एकटाच होता. स्फोटाचा आवाज झाल्यानंतर शेजाऱ्यांनी तत्काळ अग्निशमन दलाला याबाबत माहिती दिली. या दुर्घटनेत आर्या गंभीर जखमी झाला. शेजाऱ्यांनी तत्काळ त्याला शीव रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा >>>मुंबई: धमकी देऊन बलात्कार करणाऱ्या आरोपीला पकडण्यात यश

दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. गॅस सिलिंडर स्फोटामुळे घरात लागलेली आग अग्निशमन दलाच्या जवानांनी आटोक्यात आणली. मात्र स्फोटाच्या तीव्रतेने पाटील यांच्या घराचे मोठे नुकसान झाले. आरसीएफ पोलिसांनी या घटनेची नोंद करून तपास सुरू केला आहे.