मुंबई : रस्त्याने जाताना मोटारगाडीचा दुचाकीला धक्का लागल्याने झालेल्या वादानंतर दोन भावांनी चालकाच्या घरात घुसून त्याची हत्या केल्याची घटना गोवंडी परिसरात घडली. याबाबत शिवाजी नगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत यामध्ये दोन्ही आरोपींना अटक केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आदील खान (३५) असे यातील मयत तरुणाचे नाव असून तो गोवंडीच्या शिवाजी नगर परिसरातील बैंगणवाडी येथे राहत होता. शनिवारी रात्री दहाच्या सूमारास आदिल त्याची कार घेऊन घरी जात होता. याच वेळी रस्त्यालगत उभी असलेल्या एका दुचाकीला कारचा धक्का लागला. त्यानंतर ही दुचाकी एका महिलेचा अंगावर पडल्याने यामध्ये या महिलेला किरकोळ दुखापत झाली होती. याच कारणावरून या दोघांमध्ये काही वेळ वाद झाला होता. महिलेने ही बाब तिच्या मुलांना सांगितल्यानंतर त्यांनी देखील आदिलसोबत वाद घातला.

हेही वाचा >>>मुंबईत महिनाअखेरीपर्यंत गारठा कायम राहणार

मात्र, रात्री पुन्हा या ठिकाणी मोठा वाद झाला. यावेळी महिलेच्या दोन्ही मुलांनी आदिलच्या घरी जाऊन त्याच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्यात आदिल गंभीर जखमी झाला होता. त्याला तत्काळ गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याबाबत शिवाजी नगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत, आरोपींचा शोध सुरू केला. मात्र तो पर्यंत दोन्ही आरोपी फरार झाले होते. अखेर रविवारी पहाटे पोलिसांनी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून अब्दुल शेख आणि शरीफ शेख या दोन्ही आरोपीना अटक केली असून पोलीस त्यांच्याकडे याबाबत अधिक तपास करत आहेत.