बारामती : सहकारी साखर कारखान्याचे निवडणूक ही राजकीय पक्षावर नाही तर शेतकऱ्यांच्या विचारावर लढली जाते,साखर कारखाना हा शेतकऱ्यांच्या मुळे चालतो, बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखाना हा ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांचा कारखाना म्हणून राज्यात ओळखला जातो, जेष्ठ नेते शरद पवार हे स्वतः त्या कारखान्याचे सभासद सुद्धा आहेत, त्यांनी याच साखर कारखान्याच्या विकासा साठी खूप काही विकास कामे केलेली आहेत, असे असताना सुद्धा ऊस उत्पादक शेतकरी वर्गामध्ये मध्ये सध्या नाराजी आहे, कारखान्याचे स्वाभिमानी सभासद यांची जर मागणी असेल तर आम्ही पूर्ण ताकद त्यांच्या पाठीशी लावणार आहोत. असे स्पष्ट संकेत युवा नेते युगेंद्र पवार यांनी दिले आहेत .

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याचे (शरद पवार ) युवा नेते युगेंद्र पवार त्यांनी आज बारामतीत प्रसार माध्यमांशी संवाद साधताना आपले मत व्यक्त केले, श्री. युगेंद्र पवार बोलताना म्हणाले, “ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या विकासासाठी खूप भरीव कामगिरी केली आहे, कारखान्याच्या सभासदांचा विचार करून सहवीज प्रकल्प, अभियांत्रिकी महाविद्यालय, पॉलिटेक्निकल महाविद्यालय, कारखान्या अंतर्गत विविध सुविधा उपलब्ध करून दिले आहेत, कारखान्याच्या ऊस उत्पादक सभासदांची आणि कार्यकर्त्यांची एक बैठक सुद्धा आयोजित केली होती, या बैठकीमध्ये सभासदांचे विचार,अडचणी आम्ही समजावून घेतल्या आहेत , या बैठकीमध्ये अनेक शेतकऱ्याचे मत असे होते की,”आपण या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांच्या मागे उभे राहिले पाहिजे, शेतकऱ्यांना ताकद दिली पाहिजे,” आता या पुढील होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार कार्यकर्त्यांना आम्ही ताकद देणार आहोत, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या येणाऱ्या निवडणुकीत सुद्धा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून लढण्याच्या विचार करीत आहोत, शेवटी आमचाही राजकीय पक्ष आहे, आणि पक्षाच्या वाढीसाठी आम्ही सदैव कार्यकर्त्यांच्या मागे खंबीर पणे उभे राहिलेच पाहिजे,असे संकेत सुद्धा युवा नेते युगेंद्र पवार यांनी दिले आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार ) हे आपली माळेगाव साखर कारखान्याची सत्ता पुन्हा मिळविण्यासाठी प्रयत्नशीर राहणार असल्याने या वेळी निवडणुकीत मोठी चुरस निर्माण होणार आहे, माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अद्याप जाहीर झालेली नसली तरी राजकीय हालचालींना कमालीचा वेग आल्याचे दिसून येत आहे.

माळेगाव कारखान्याची निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता…

बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लवकरच रंगतदार होणार असल्याची शक्यता आहे, सभासदांची यादी प्रसिद्ध केली जात असून सभासदाच्यात नावात वाढ झाल्यामुळे सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ बनले आहे, अशी माहिती कारखान्याचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक रंजन तावरे यांनी दैनिक लोकसत्ता प्रतिनिधीशी बोलताना दिली. दरम्यान,माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एक हाती सत्ता आहे, हा कारखाना जेष्ठ नेते शरद पवार यांनी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नावारूपाला आणून प्रगतीपथावर नेला आहे, परंतु मध्यंतरच्या काळामध्ये पवार विरोधातील जेष्ठ नेते चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांनी या साखर कारखान्यावर विजय मिळवून पवार यांना धक्का दिला होता, राज्यातील पहिल्या पाच कारखान्यांमध्ये बारामतीच्या माळेगाव साखर कारखानाचा समावेश करण्यात येतो.