लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : चेंबूरच्या वाडवली गाव परिसरात राहणाऱ्या एका २१ वर्षीय तरुणावर तीन ते चार जणांनी धारदार हत्याराने वार करून त्याचा खून केल्याची घटना रविवारी रात्री घडली आहे. याबाबत आरसीएफ पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

विघ्नेश नारायण चांगले (२१) असे या मृत तरुणाचे नाव असून तो चेंबूरच्या वाडवली गाव परिसरात तो राहात होता. रविवारी मध्यरात्री तो घरी जात असताना तेथे नशा करणाऱ्या काही आरोपींशी त्याचा वाद झाला. त्यानंतर आरोपींनी पुन्हा त्या तरुणाला आणि त्याच्या भावाला तेथे बोलावले. यावेळी तिन्ही आरोपींनी त्याला बेदम मारहाण करून त्याच्यावर चाकूने वार केले. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

त्या हल्ल्यात विघ्नेशच्या भावाला देखील मोठी दुखापत झाली असून त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरसीएफ पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र घटनेनंतर आरोपींनी पळ काढला असून पोलीस या आरोपींचा शोध घेत आहेत.