रेश्मा राईकवार, लोकसत्ता
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुंबई : दिवाळीच्या सुट्टीत गेल्या दोन वर्षांत देशांतर्गत धार्मिक पर्यटनाची टक्केवारी वाढत आहे. यंदा धार्मिक पर्यटन करणाऱ्यांमध्ये ८० ते १०० टक्के वाढ झाली आहे. तीर्थक्षेत्रे, निसर्गसौंदर्य तसेच साहसी खेळांचा एकत्रित अनुभव देणाऱ्या स्थळांना तरुणाईची गर्दी अधिक असल्याचे निरीक्षण पर्यटन व्यावसायिकांनी नोंदवले आहे.
गेल्या काही वर्षांत एखाद्या प्रसिद्ध प्रार्थनास्थळांबरोबर तेथील खाद्यसंस्कृती, जीवनशैली, उपलब्ध असलेले साहसी खेळ आणि अन्य निसर्गसुंदर ठिकाणे यांचा एकत्रित अनुभव घेण्याकडे पर्यटकांचा कल वाढतो आहे. त्याचबरोबर वाराणसी, अयोध्या, गिरनार या ठिकाणांकडेही पर्यटकांचा कल आहे.
धार्मिक पर्यटन करणाऱ्या परदेशी पर्यटकांची संख्या ६६ लाखांहून अधिक होती. करोनाकाळातील आव्हाने आणि ताणतणावातून मार्ग काढण्यासाठी आध्यात्मिक वा धार्मिक स्थळांना भेटी देण्याचे प्रमाण वाढल्याचे निरीक्षण व्यावसायिकांनी नोंदवले आहे.
हेही वाचा >>> किशोरी पेडणेकर, वेलारसू यांना ईडीचे समन्स
आध्यात्मिक अनुभूती, योग-ध्यानधारणांसाठी लोकप्रिय असलेल्या स्थळांची निवड करण्यात तरुण पर्यटक अग्रेसर आहेत, अशी माहिती थॉमस कुक (इंडिया)चे अध्यक्ष राजीव काळे यांनी दिली.
परिचितांकडून माहिती, छायाचित्रेही पाहायला मिळत असल्याने साहजिकच धार्मिक स्थळांची आपोआप प्रसिद्धी होत असल्याची माहिती ‘केसरी टूर्स’चे व्यवस्थापकीय संचालक शैलेश पाटील यांनी दिली.
चारधाम, दो धाम यात्रा, नेपाळमधील मुक्तीनाथ, अमरनाथ, वाराणसी-प्रयागराज, अयोध्या, सोमनाथ, काशी विश्वनाथ आणि उज्जैनचे महाकाल महाराष्ट्रातही धार्मिकस्थळांवर गर्दी महाराष्ट्रात धार्मिक पर्यटनक्षेत्रात शिर्डीत सर्वाधिक गर्दी असते. त्याखालोखाल भीमाशंकर, घृष्णेश्वर, औंढा-नागनाथ ज्योतिर्लिग, साडेतीन शक्तीपीठे, अष्टविनायक याच्याबरोबरीने गणपतीपुळेसारख्या स्थळांना अधिक गर्दी असते.
करोनानंतर एकूणच धार्मिक पर्यटन करणाऱ्यांमध्ये ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे, त्यातही या स्थळांना भेट देणाऱ्या तरुणाईच्या संख्येत २०१९ पेक्षा २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. नवरात्रीच्या काळात वैष्णोदेवी, हिमाचल प्रदेश, उज्जैन, कोलकत्ता, छत्तीसगड तसेच कोल्हापूरची महालक्ष्मी या प्रसिद्ध देवीच्या मंदिरांना सर्वाधिक पर्यटकांनी भेट दिली. – डॅनियल डिसूझा, अध्यक्ष – एसओटीसी ट्रॅव्हल्स
या दिवाळीच्या सुट्टीतही एमटीडीसीची रिसॉर्ट्स ऐंशी ते शंभर टक्के भरलेली आहेत. मंदिरे आणि लागूनच असलेला समुद्रकिनाऱ्या याशिवाय, ताडोबासारख्या जंगल सफारीलाही पर्यटकांचा मोठा प्रतिसाद आहे. – चंद्रशेखर जयस्वाल, महाव्यवस्थापक – एमटीडीसी