लोकसत्ता प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुंबई : गेले दोन-तीन दिवस यशराज फिल्म्स प्रॉडक्शनच्या वतीने भजन कुमार नामक नवोदित गायकाला लॉन्च करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. हा भजन कुमार नामक नवोदित गायक कोण याचा उलगडा बुधवारी करण्यात आला. यशराजच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एका खास सोहळ्यात या भजन कुमारच्या नव्या गाण्याचे प्रकाशन करण्यात आले आणि हा गायक दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता विकी कौशल असल्याचे स्पष्ट झाले.
यशराज प्रॉडक्शनच्या ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ या चित्रपटात अभिनेता विकी कौशल मुख्य भूमिकेत असून त्याने भजन कुमार ही व्यक्तिरेखा साकारली आहे. या चित्रपटातील ‘कन्हैय्या ट्विटर पे आजा’ या पहिल्यावहिल्या गाण्याचे आज प्रकाशन करण्यात आले. ‘मी पहिल्यांदाच ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ या चित्रपटात एका गायकाची भूमिका केली आहे. भजन कुमार असे त्याचे नाव आहे. तर हा भजन कुमार प्रेक्षकांसमोर येण्याआधी काही गंमत करून पाहूया असे आम्ही ठरवले होते. त्यामुळे या भजन कुमार नामक नवोदित गायकाला लोकांसमोर आणण्याचा घाट वायआरएफने घातला’ असा खुलासा यावेळी विकीने केला. या चित्रपटात विश्वसुंदरी आणि अभिनेत्री मानुषी छिल्लर त्याच्याबरोबर नायिकेच्या भूमिकेत आहे.
आणखी वाचा-“मला वाटतं होत की…” सावत्र बहीण ईशा देओलबरोबरच्या नात्यावर सनी देओलचे भाष्य, म्हणाला…
‘मला स्वत:ला लोकांच्या चेहऱ्यावर हसू पाहायला खूप आवडते. एक अभिनेता म्हणून भजन कुमारच्या भूमिकेत मी प्रेक्षकांचे मनोरंजन करू शकेन, त्यांना हसवू शकेन अशी आशा वाटते. प्रेक्षकांचा या भजन कुमारला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहण्यासाठी मी आतूर आहे’, असेही विकी कौशल याने यावेळी सांगितले. विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ हा चित्रपट २२ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.