लोकसत्ता खास प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर आता त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी व अभिनेता सलमान खान यांना धमकी देण्यात आली आहे. आमदार झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयात याबाबत दूरध्वनी आला असून निर्मल नगर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. धमकी देणाऱ्याने झिशान सिद्दीकी व सलमानला धमकी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

माजी राज्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यांच्या पक्ष कार्यालयाबाहेरच लॉरेन्स बिश्नाई गँगच्या शूटरने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर झिशान सिद्दीकी यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. बाबा सिद्दीकी यांची हत्या ज्या कार्यालयाबाहेर झाली, त्याच कार्यालयात मंगळवारी संध्याकाळी धमकीचा दूरध्वनी आला होता. याबाबत पोलिसीस तपास करीत आहेत.

आणखी वाचा-मराठी माणसासाठी घरे राखीव ठेवा! विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘पार्ले पंचम’ची भूमिका

खेरवाडी परिसरात बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबर रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकीची सुरक्षा वाढवण्यात आली होती. त्यांच्या सुरक्षेची नुकतीच पडताळणी केली असता सुरक्षा रक्षक कर्तव्याच्या ठिकाणी अनुपस्थित असल्याचे आढळले होते. त्यामुळे पोलीस उपायुक्तांनी सुरक्षा रक्षकांना निलंबित केले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zeeshan siddique and actor salman khan threatened mumbai print news mrj