Zeeshan Siddique : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते बाबा सिद्दिकी यांची १२ ऑक्टोबरला दसऱ्याच्या दिवशी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बाबा सिद्दिकी हे झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयाबाहेर असताना तीन हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यात बाबा सिद्दिकी यांचा मृत्यू झाला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही घटना घडल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमागे कोण आहे याचा तपास पोलीस करत आहेत.

लॉरेन्स बिश्नोईचं नाव हत्या प्रकरणात समोर

बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यात आल्यानंतर कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचं नाव समोर आलं. तसंच एसआरए प्रकल्पाशी संबंधित प्रकरणामुळे बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यात आली असाही एक पैलू समोर आला आहे. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. पोलिसांनी या प्रकरणात दोन हल्लेखोरांना तातडीने अटक केली होती. आत्तापर्यंत पोलिसांनी बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात १० हून जास्त आरोपींना अटक केली आहे. या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर १२ दिवसांनी बाबा सिद्दिकींचे पुत्र झिशान सिद्दिकी ( Zeeshan Siddique ) यांनी एक भावूक पोस्ट लिहिली आहे.

When Devendra Fadnavis becomes Chief Minister conspiracy is hatched to create communal tension says Amar Sable
“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतात तेव्हा जातीय तणाव निर्माण करण्याचं षड्यंत्र…”- अमर साबळे
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Sanjay Raut Brother Post News
Sanjay Raut Brother : संजय राऊत यांच्या सख्ख्या भावाची पोस्ट चर्चेत; डिलिट करत म्हणाले, “मी..”
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
Sane Guruji , book Sane Guruji Jeevan Gatha,
‘साने गुरुजींची जीवनगाथा’ आता ‘श्रवणीय’
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?

हे पण वाचा- बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण : कट रचणारा व शूटर्समधील दुवा पोलिसांच्या हाती, हरियाणातून एकाला अटक

काय आहे झिशान सिद्दिकींची पोस्ट?

झिशान सिद्दिकी ( Zeeshan Siddique ) यांनी वडील बाबा सिद्दिकींसह एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाच वर्षांपूर्वीचा आहे. २५ ऑक्टोबर २०१९ चा हा फोटो आहे. या दिवशी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला होता. त्यावेळी झिशान सिद्दिकी यांचा वांद्रे येथून विजय झाला होता. त्यावेळी बाबा सिद्दिकी यांना प्रचंड आनंद झाला होता. बाबा सिद्दिकी यांनी त्यावेळी झिशान यांना गळाभेट घेतली होती. त्या भेटीचा क्षण कुणीतरी कॅमेऱ्यात कैद केला होता. तोच फोटो शेअर झिशान सिद्दिकी यांनी पोस्ट केला आहे आणि भावनिक पोस्ट केली आहे. “तुमच्या मेहनतीमुळे आणि माझ्यावरील विश्वासामुळे जे क्षण शक्य झाले ते या फोटोत कैद झाले होते, बाबा, मला रोज तुमची आठवण येते”, असं झिशान सिद्दिकी ( Zeeshan Siddique ) हे त्यांच्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हणाले आहेत.

झिशान सिद्दिकी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत

झिशान सिद्दिकी ( Zeeshan Siddique ) हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. तसंच महाविकास आघाडीतल्या शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने जी यादी जाहीर केली त्यात वांद्रे या मतदारसंघातून वरुण सरदेसाईंना उमेदवारी दिली. त्यानंतर झिशान सिद्दिकी यांनी एक खरमरीत पोस्ट लिहिली होती. आता झिशान सिद्दिकी हे त्यांच्या भावनिक पोस्टमुळे पुन्हा चर्चेत आहेत.

Story img Loader