मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णाला बाजारातील दुकानांमधून औषध खरेदी करावे लागू नये यासाठी १५ जानेवारीपासून सर्व रुग्णालयांमध्ये शुन्य वैद्यकीय चिठ्ठी योजना लागू करण्यात येणार आहे. यामुळे महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांवर सर्व उपचार मोफत होणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये शुन्य वैद्यकीय चिठ्ठी योजना लागू करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार या योजनेची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया सुरू असून, महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये १५ जानेवारीपासून ही योजना लागू करण्यात येणार आहे. ही योजना लागू झाल्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांना उपचारासाठी एकही रुपया खर्च करावा लागणार नाही. सर्व उपचार मोफत होतील, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांनी दिली.

Devendra Fadnavis claims that Ladaki Bahin Yojana will benefit everyone without discrimination
धर्मभेद न करता लाडकी बहीण योजनेचा सर्वांना लाभ; देवेंद्र फडणवीस यांचा दावा
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
pune Arogya sena
औषधांच्या किमती नियंत्रणात आणा, आरोग्य व्यवस्था सक्षम करा! निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेनेकडून खुला जाहीरनामा
investors of DSK, Maval-Mulshi sub-divisional magistrate, Court, DSK,
‘डीएसके’ यांच्या गुंतवणूकदारांची यादी सादर करण्याचे मावळ-मुळशी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना न्यायालयाचे आदेश
Greater Noida
Greater Noida : डोळ्यावर शस्त्रक्रिया न करताच हॉस्पिटलने ४५ हजार उकळले; दुसऱ्या डॉक्टरनी तपासल्यानंतर झालं उघड
indian rupee falls to all time low against us dollar
अग्रलेख : काका… मला वाचवा!
RBI announces changes to KYC rules! How it will impact you
KYC : RBI ने केली KYC नियम बदलण्याची घोषणा, आपल्यावर नेमका कसा परिणाम होणार?
pune municipal corporation create email address for complaints regarding water issues
समाविष्ट गावातील पाणीपुरवठ्याच्या तक्रारींसाठी पालिकेने घेतला हा निर्णय !

हेही वाचा – रेल्वेतील धूरशोधक यंत्रणा निष्क्रिय

आतापर्यंत आयव्ही संच, ग्लुकोज, शस्त्रक्रियेसाठी लागणारी उपकरणे, विविध आजारांवरील औषधे, तपासणी संच आदी एक हजार औषधे व शस्त्रक्रियेसाठी लागणारे साहित्य महानगरपालिका रुग्णांना उपलब्ध करून देत होती. मात्र ही योजना लागू केल्यानंतर महानगरपालिकेकडून खरेदी करण्यात येणारी औषधे व साहित्यांची संख्या चार हजारांच्या घरात पाेहोचेल, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा – पाच महिन्यांत तीन गिरण्यांमधील १,४७० गिरणी कामगारांना घरांचा ताबा

मुंबई महानगरपालिकेची चार वैद्यकीय महाविद्यालये, एक दंत महाविद्यालय, १६ उपनगरीय रुग्णालये, पाच विशेष रुग्णालये, ३० प्रसूती रुग्णालये, १९२ दवाखान्यांबरोबरच २०२ हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आहेत. वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सात हजार १०० खाटा, उपनगरीय रुग्णालयांमध्ये चार हजार खाटा, विशेष रुग्णालयांमध्ये तीन हजार खाटा अशा जवळपास १५ हजार खाटा आहेत. ही रुग्णालये व दवाखान्यांमध्ये दररोज ५० हजारांहून अधिक रुग्ण उपचार घेत असतात.