लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये शून्य औषध चिट्ठी योजना लागू करण्यासाठी औषध खरेदीशी संबंधित निविदा प्रक्रियेतील पडताळणी वेगाने पूर्ण करावी, यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ आणि अतिरिक्त संगणकांचा पुरवठा करावा, तसेच मोहीम स्वरूपात काम करून येत्या ६ सप्टेंबरपर्यंत पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी आणि कोणत्याही परिस्थितीत १५ सप्टेंबरपर्यंत कार्यादेश द्यावेत, असे सक्त निर्देश अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी मध्यवर्ती खरेदी खात्यासह रूग्णालय प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे ही योजना सप्टेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे.

country first heart liver transplant surgery success led by dr anvay mulay
देशातील पहिली हृदय-यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी!
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
snake bites disease
सर्पदंश हा आजार मानला जाणार? कारण काय? याला अधिसूचित आजार घोषित करण्याची मागणी केंद्राकडून का होत आहे?
Onion prices fall due to increased production
नाशिक : आवक वाढल्याने कांद्याची घसरण
Saket Bridge, Mumbai Nashik Traffic, Road Widening,
मुंबई-नाशिक मार्गावर पुढील तीन महिने कोंडीचे, साकेत पुलाजवळील मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणास सुरूवात
3 percent errors possible in ladki bahin yojana application scrutiny
लाडकी बहीण योजनेच्या अर्ज छाननीत तीन टक्के त्रुटींचा संभव;  नाशिक विभागातील स्थिती
Sale of fake oil Bhiwandi, fake oil Bhiwandi,
ठाणे : ब्रँडचे नाव वापरून बनावट तेलाची विक्री
What is the National Health Claim Exchange health insurance
आरोग्य विम्याची प्रक्रिया आता जलद? काय आहे ‘नॅशनल हेल्थ क्लेम एक्स्चेंज’?

महानगरपालिका रूग्णालयामध्ये औषधोपचारासाठी येणाऱ्या रूग्णांना आवश्यक असणारी औषधे बाहेरील दुकानांमधून खरेदी करावी लागू नयेत, यासाठी शून्य औषध चिठ्ठी योजना अर्थात ‘झिरो प्रिस्कीप्शन धोरण’ राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिका प्रशासनाला दिले होते. मात्र अद्याप ही योजना सुरू होऊ शकलेली नाही. आचारसंहिता, किचकट निविदा प्रक्रिया यामुळे ही योजना रखडली आहे. ही प्रक्रिया अधिक वेगाने होऊन नागरिकांना या धोरणाचा लाभ मिळावा, या उद्देशाने मुंबई महानगरपालिका प्रशासनाची एक महत्त्वपूर्ण बैठक बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी महानगरपालिका मुख्यालयात पार पडली.

आणखी वाचा-Mumbai Local : विरार एसी लोकलमधला धक्कादायक प्रकार, दंडाचे पैसे मागितल्याने शर्ट फाडत टीसीला मारहाण

शून्य औषध चिठ्ठी योजना महापालिकेची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या अंमलबजावणीमुळे रूग्णांना महापालिकेच्या रूग्णालयातच मोफत औषधे उपलब्ध होणार आहेत. यासाठी मध्यवर्ती खरेदी खात्यामार्फत सुरू असलेल्या निविदा प्रक्रियेत विविध सूचीअंतर्गत निरनिराळी औषधे व वैद्यकीय बाबींची पडताळणी प्रक्रिया सध्या मध्यवर्ती खरेदी खाते आणि बा. य. ल नायर रूग्णालय यांच्यामार्फत सुरू आहे. ही प्रक्रिया अधिक वेगाने होण्यासाठी आवश्यक असणारे वरिष्ठ फार्मासिस्ट, फार्मासिस्ट आणि डेटा एंट्री ऑपरेटर आदी अतिरिक्त मनुष्यबळ व या अतिरिक्त मनुष्यबळाला आवश्यक असणारे अतिरिक्त संगणक तातडीने म्हणजे पुढच्याच दोन दिवसात उपलब्ध करून देण्याचे आदेश बांगर यांनी बैठकीदरम्यान सह आयुक्त (मध्यवर्ती खरेदी खाते) विजय बालमवार, उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱ्हाडे, संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रूग्णालये) डॉ. नीलम अंद्राडे यांना दिले.

आणखी वाचा-मुंबई : आई मद्यधुंद अवस्थेत असताना पित्याकडून १३ वर्षांच्या मुलीवर अत्याचार

सोमवार ते शनिवार दरम्यान मोहीम पद्धतीने अतिरिक्त मनुष्यबळ वापरून हे काम पूर्ण करावे आणि पथके नेमून कामांचा दररोज आढावा घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या सर्व कार्यवाहीसाठी तीन आठवड्यांची मुदत अतिरिक्त आयुक्तांनी दिली आहे.

Story img Loader