अल्पवयीन मूकबधिर मुलीचे चुंबन घेतल्याप्रकरणी लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदयांतर्गत (पोक्सो) अटकेत असलेल्या झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयला विशेष न्यायालयाने नुकताच जामीन मंजूर केला. घटना घडली त्यावेळी आरोपी घटनास्थळी उपस्थित नसल्याचे झोमॅटो अ‍ॅपच्या ट्रॅकिंग (जीपीएस) यंत्रणेच्यामाध्यमातून स्पष्ट होत असल्याचे सकृतदर्शनी मत नोंदवून न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- “…तर अख्खं राज्य पेटून उठलं असतं,” भुजबळांनी राज्यपालांना सुनावलं, म्हणाले “जरा सांभाळून बोला”

पोलिसांनी सादर केलेले पुरावे विचारात घेता घटनेच्या दिवशी सायंकाळी ७.३९ ते मध्यरात्री २.४५ पर्यंत आरोपी हा खाद्यपदार्थ घरपोच करण्याचे काम करत होता. पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार पीडित मुलीचे आईवडील कामासाठी बाहेर गेले होते. आई रात्री नऊच्या सुमारास घरी आली, त्यावेळी पीडित मुलीने ती किराणाच्या दुकानातून घरी परतत असताना आरोपीने तिचे रस्त्यात चुंबन घेतल्याचे सांकेतिक भाषेत सांगितले. त्यानंतर पीडित मुलीने आईला आरोपीच्या घरी नेले. त्यावेळी आरोपी घरी नव्हता. मात्र काही वेळाने तो घरी आला. त्यावेळी पीडित मुलीने त्याकडे अंगुलीनिर्देश करून तिच्याशी आक्षेपार्ह वर्तन केल्याचे सांगितले. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने पोलिसांत या प्रकरणी आरोपीविरोधात तक्रार नोंदवली.

हेही वाचा- मुंबई: लोकल प्रवाशांचे आज ‘मेगाब्लॉक’मुळे हाल; कर्नाक उड्डाणपूल पाडकाम सुरू

पीडित मुलीचे कुटुंबीय आणि आपल्या कुटुंबीयांमध्ये सतत भांडण होत असते. त्यामुळेच सूड उगवण्यासाठी आपल्याला या प्रकरणी गोवण्यात आल्याचा दावा आरोपीने जामिनाची मागणी करताना केला होता. शिवाय घटना घडली त्या दिवशी आपण घरी नव्हतो. त्या दिवशी आपण सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत खाद्यपदर्थ घरी पोहोचवण्याचे काम करत होतो. आपण घरातील एकमेव कमावते असल्याने कारागृहात राहिल्यास आपल्या कुटुंबियांना हालाखीच्या परिस्थितीला सामोरे जावे लागेल. शिवाय नोकरीही धोक्यात येईल, असा दावाही आरोपीने केला होता. दुसरीकडे आरोपीला जामीन देण्यात आल्यास तो पीडित मुलीला धमकावण्याची शक्यता व्यक्त करून पोलिसांनी त्याच्या जामीन देण्यास विरोध केला.

हेही वाचा- गौतम नवलखा नवी मुंबईतील घरात नजरकैदेत

त्यावर झोमॅटोच्या जीएपीएस यंत्रणेचा विचार करता आरोपी त्या दिवशी सायंकाळपासून मध्यरात्री उशिरापर्यंत खाद्यपदार्थ घरपोच करण्याचे काम करत होता. या उलट पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार पीडित मुलगी आईसोबत घटनेच्या दिवशी रात्री नऊच्या सुमारास आरोपीच्या घरी गेली. सुरूवातीला तो तेथे नव्हता. मात्र त्यानंतर आला आणि पीडित मुलीने आरोपीकडे अंगुलीनिर्देश करून त्याने तिच्याशी आक्षेपार्ह वर्तन केल्याचे सांगितले. ही विसंगती आरोपीने जामीन मागताना केलेल्या दाव्याचे समर्थन करणारी आहे, असे नमूद करून न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर केला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zomato delivery boy arrested under pocso granted bail mumbai print news dpj