मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बृहन्मुंबईच्या घरभाडे व्यवस्थापन प्रणालीचा राष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात आला आहे. या प्रणालीस दिल्ली येथे एका समारंभात ‘स्काॅच सुवर्ण गौरव’ या प्रतिष्ठीत पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविताना अनेक विकासक झोपडीधारकांचे घरभाडे थकवित असून घरभाडे देणेही बंद करत आहेत. त्यामुळे झोपडीधारकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. घरभाड्यासंबंधित अनेक तक्रारी झोपु प्राधिकरणाला प्राप्त झाल्या होत्या, तर घरभाड्यापोटीची कोट्यवधींची थकबाकी विकासकांकडे होती. या सर्व पार्श्वभूमीवर घरभाड्याचा प्रश्न निकाली काढत झोपडीधारकांना दिलासा देण्यासाठी झोपु प्राधिकरणाने घरभाडे वसूली करण्यासाठी विशेष मोहिम हाती घेतली. तर नवीन प्रकल्पासाठी तीन वर्षांचे घरभाडे झोपडीधारकांना देणे विकासकांसाठी बंधनकारक केले. तसेच घरभाडे वसूलीसाठी, घरभाड्यासाठीच्या तक्रारी दाखल करुन घेण्यासाठी आणि तक्रारींचे निवारण करण्यासाठी घरभाडे व्यवस्थापन प्रणाली प्राधिकरणाने कार्यान्वित केली. या प्रणालीनंतर तक्रारींचे निवारण करत मोठ्या प्रमाणावर थकबाकी वसूल करण्यात प्राधिकरणाला यश आले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा