लोकसत्ता टीम

नागपूर: करोनानंतर सातत्याने सोने- चांदीच्या दरात वाढ होतांना दिसत आहे. हे दर रोज नवीन उंचीवर जात असल्याने ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान धुलिवंदनाच्या दुसऱ्याच दिवशी चांदीचे दर प्रति किलो १ लाख पार झाले. तर सोन्याचे दर बघूनही ग्राहकांमध्ये चिंता वाढली आहे. शनिवारी (१५ मार्च २०२५ रोजी) सोने- चांदीचे दर काय होते? याबाबत आपण जाणून घेऊ या.

सोन्याचे दर सातत्याने वाढत असून रोज नवीन विक्रमी उंचावर जातांना दिसत आहे. मागील मागील वर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पानंतर सोन्याच्या दरात मोठी घट बघायला मिळाली होती. केंद्र सरकारने सोन्यावरील सिमा शुल्क कमी केल्याने हे दर कमी झाले होते. परंतु त्यानंतर पून्हा सातत्याने दरवाढ होऊन बघता- बघता सोन्याचे दर विक्रमी उंचिवर पोहचले आहे. त्यातच होळीतील धुलिवंदनाच्या दुसऱ्या दिवशी या सोन्याच्या दराने उंचीचा आणखी एक नवीन विक्रम केला आहे.

नागपुरातील सराफा बाजारात होळीच्या एक दिवसापूर्वी मंगळवारी सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ८६ हजार रुपये, २२ कॅरेटसाठी ८० हजार रुपये, १८ कॅरेटसाठी ६७ हजार १०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५५ हजार ९०० रुपये नोंदवले गेले. हे दर धुलिवंदनाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी (१५ मार्च २०२५ रोजी) २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ८८ हजार २०० रुपये, २२ कॅरेटसाठी ८२ हजार रुपये, १८ कॅरेटसाठी ६८ हजार ८०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५७ हजार ३०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे नागपुरातील सराफा बाजारात ११ मार्च २०२५ रोजीच्या तुलनेत १५ मार्च २०२५ रोजी सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम २ हजार २०० रुपये, २२ कॅरेटसाठी २ हजार रुपये, १८ कॅरेटसाठी १ हजार ७०० रुपये, १४ कॅरेटसाठी १ हजार ४०० रुपये आणखी वाढल्याचे नोंदवले गेले. त्यामुळे लग्नसमारंभ, वाढदिवसासह इतर कार्यक्रमात दागिने खरेदीचा बेत असलेल्या ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरन आहे.

चांदीच्या दरातही मोठे बदल…

नागपुरातील सराफा बाजारात ११ मार्च २०२५ रोजी चांदीचे दर प्रति किलो ९६ हजार ७०० रुपये होते. हे दर धुलिवंदनाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी (१५ मार्च २०२५ रोजी) प्रति किलो १ लाख ५०० रुपये रुपये नोंदवले गेले. त्यामुळे ११ मार्च २०२५ रोजीच्या तुलनेत १५ मार्च २०२५ रोजी चांदीच्या दरात प्रति किलो तब्बल ३ हजार ८०० रुपयांची वाढ नोंदवली गेली.

Story img Loader