लोकसत्ता टीम

बुलढाणा : मागील दहा वर्षात देशाला देशोधडीला लावणारे, केंद्रातील सरकार आपलं नाही, हे जुलुमी सरकार उलथवून केंद्रात आपलं हक्काचं सरकार आणा, असे कळकळीचे आवाहन शिवसेना (उबाठा) नेते आदित्य ठाकरे यांनी येथे केले. सर्व समाज घटकांची दैना करणारे, दारुण अपेक्षा भंग करणारे आणि महाराष्ट्रात येणारे सर्व उद्योग गुजरातला पळवून नेणारे ‘दिल्ली वाले’ आपले नाहीच याची खूण गाठ मनाशी बांधा, असा इशाराही त्यांनी दिला.

Uddhav Thackery News
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा सवाल, “पंतप्रधान मोदींनी महाकुंभात डुबकी मारली, पण गणपती विसर्जन करु देत नाही हेच तुमचं हिंदुत्व?”
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Devendra Fadnavis to Inaugurate TJD Deccan Summit 2025
ठाकरे, पवारांचे आधीच ठरले होते, मुख्यमंत्री फडणवीस यांचे मोठे वक्तव्य !
Rohit Pawar On Delhi Election Result
Rohit Pawar : “…तर भाजपाच्या २० जागाही आल्या नसत्या”, रोहित पवारांची दिल्लीच्या निकालावर सूचक प्रतिक्रिया
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray : “…अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरणार”, आदित्य ठाकरेंचा इशारा; मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पावरही टीका
raj thackeray urges writers to speak on political issues
सरकार कोणाचेही असो, बोलले पाहिजे! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे साहित्यिकांना आवाहन
Girish Mahajan On Nashik Guardian Minister
Girish Mahajan : नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत गिरीश महाजनांचं मोठं विधान; म्हणाले, “…म्हणून आम्ही मागणी केली होती”
Uddhav Thackeray, Ahilyanagar, existence,
अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाला गळती, अस्तित्वाचा प्रश्न

बुलढाणा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर जिजामाता प्रेक्षागार नजीकच्या मैदानात आयोजित सभेत बोलताना आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी ठाकरे गटाचे अंबादास दानवे, सुषमा अंधारे, राष्ट्रवादी चे युवानेते रोहित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

आणखी वाचा-कौटुंबिक कारणातून युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न, पण देवदुतासारखे धावून आले पोलीस; दरवाजा तोडून…

भाषणापूर्वी पाऊण तास सामान्य कार्यकर्त्याप्रमाणे नरेंद्र खेडेकर व रोहित पवार यांच्याशी हितगुज करणाऱ्या आदित्य ठाकरेंचा आजचा ‘मूड’ वेगळाच होता. त्यांनी हातात माईक घेत उपस्थित शेतकरी, युवा व महिलांसोबत संवाद साधत व प्रश्न विचारीत भाषण केले. शेतमालाला भाव मिळाला का, नुकसानीची अन पिकविम्याची मदत मिळाली का, असे प्रश्न त्यांना मोठ्या संख्येतील शेतकऱ्यांना विचारले. त्याची उत्तरे आल्यावर आघाडी सरकार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या कर्जमुक्तीची आठवण करून दिली. करोना काळातही आपद्ग्रस्त बळीराजाला १४ हजार कोटींची मदत दिल्याचे सांगितले. दिल्ली आणि मुंबईतील सरकार शेतकरी विरोधी असल्याचे त्यांनी सांगितले. रोजगार मिळतो का, असे युवकांना विचारून भरती मधील घोटाळ्यावरून सरकारवर टीका केली. यावेळी व्यासपीठावर महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर, ठाकरे सेनेचे आमदार नितीन देशमुख, जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत, काँग्रेसचे राहुल बोंद्रे, हर्षवर्धन सपकाळ, संजय राठोड, जयश्री शेळके, राष्ट्रवादी चे साहेबराव सरदार, प्रसेनजीत पाटील, नरेश शेळके, राजू भोंगळ यांच्यासह मित्र पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते

यावेळी एका वृद्ध शेतकऱ्याने ईडी अन ५० खोके यावर बोलण्याची ‘फर्माईश’ केली. यावर हसत हसत त्याला तुम्ही बोलता का, असे विचारले. एवढेच नव्हे त्यांच्या हाती माईक देत बोलण्याची संधी सुद्धा दिली. यामुळे आजचे आदित्य ठाकरे यांचे वेगळ्या शैलीचे भाषण अन साधलेला संवाद सभेचे वैशिष्ट्य ठरले.

Story img Loader