लोकसत्ता टीम

नागपूर : रेल्वे प्रशासनाने तिकीट तपासणीसांना स्थानक आणि धावत्या गाडीत तपासणीचे दंडाची रक्कम वाढवण्याचे लक्ष्य ठरवून दिल्याने केवळ १३ दिवसांत १.३९ कोटी रुपयांचे दंड वसूल करण्यात आले आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने जून महिन्यातील तिकीट तपासणी महसुलात महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे.

Matheran Mini Toy Train , Mini Train Vistadome Coach,
माथेरानच्या राणीचा ‘विस्टाडोम’विनाच प्रवास
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
india railway viral news Husband-Wife Fight
नवरा-बायकोतील भांडण अन् रेल्वेचे तीन कोटींचे नुकसान! OK मुळे चुकीच्या स्थानकावर पोहोचली ट्रेन; नेमकं घडलं काय? वाचा…
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
Shocking viral video of ac local train crowd in Mumbai air conditioned local trains are disappointing shocking video goes viral
एसी ट्रेनचं तिकीट काढताय? मुंबईतल्या रेल्वे स्टेशनवरचा ‘हा’ VIDEO पाहून धडकी भरेल; पाहा नेमकं काय घडलं?
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
Terrifying Railway accident of railway employee due to train driver at barauni junction in bihar video viral
बापरे! चालकाच्या चुकीमुळे घडला मोठा अनर्थ, ट्रेन सुरू करताच झाला रेल्वे कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू, नेमकं काय घडल? पाहा VIDEO

रेल्वे प्रशासनाने तिकीट तपासणीसाठी समर्पित पथक तयार केले आहे. १ जून २०२४ ते १३ जून २०२४ या कालावधीत तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी सुमारे २० हजार ८०३ प्रवाशांकडून दंड वसूल केले. यामध्ये काही प्रवासी विनातिकीट आढळून आले. काही प्रवासी सर्वसाधारण तिकीट असताना शयनयान डब्यात बसल्याचे दिसून आले. तर काही प्रवासी शुल्क न भरता सामान वाहून नेताना सापडले. या सर्वांकडून रेल्वे तिकीट भाडे तसेच दंड वसूल करण्यात आले.धावत्या गाडीत आणि स्थानकांवर राबलेल्या तिकीट तपासणी मोहिमेमुळे विनातिकीट प्रवाशांना आणि अनधिकृत सामानाची वाहतूक रोखण्यात मदत मिळते.

आणखी वाचा-धक्कादायक! शाहरुख खानने आमिर खानवर केला चाकू हल्ला; कशावरून झाला वाद? वाचा…

प्रवाशांना सुरक्षित आणि विनात्रास प्रवास करता यावे, यासाठी ही तिकीट तपासणी मोहीम आवश्यक आहे, असे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनीष अग्रवाल यांनी म्हटले आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने एप्रिल २०२४ मध्ये सर्वांधिक महसूल तिकीट तपासणीतून मिळावला होता. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने ३.३५ कोटी, ५३ हजार प्रवासी विनातिकीट आणि सर्वसाधारण तिकीटावर शयनयान डब्यातून प्रवास करणारे आणि अनधिकृतपणे सामान वाहून नेत असल्याचे आढळून आले आहे.

भारतीय रेल्वेचा प्रवास आर्थिकदृष्ट्या परवडणारा असतो. परंतु कन्फर्म तिकीट सोपी गोष्ट नाही. रेल्वेने प्रवास करतो म्हटला की, पहिला प्रश्न पडतो. कन्फर्म तिकीट मिळेल काय. अनेकदा कन्फर्म तिकीट मिळत नाही, पण प्रवास करणे अत्यावश्यक असते. अशावेळी प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो. चुकीचे तिकीट घेऊन प्रवास केल्यास किंवा तिकीटच काढले नसेल तर रेल्वे अशा प्रवाशांवर कारवाई होते. विना तिकीट गाडीने प्रवास करणे चुकीचे तर आहेच, पण तो कायदेशीर गुन्हाही आहे. ज्यासाठी दंड, तुरुंगवास किंवा दोन्हीची तरतूद आहे.

आणखी वाचा-कोट्यवधी रुपयांची फसवणूक; पण खातेदार म्हणतात, “पोलीस केस नको”, अखेर आमदारांचा हस्तक्षेप

नागपूर, बल्लारपूर, गोंदिया, वर्धा दररम्यान विविध रेल्वेगाड्यांमध्ये तसेच नागपूर, बल्लापूर, वर्धा स्थानकावर तिकीट तापसणी केल्यानंतर अनेकांविरुद्ध कारवाई झाली आहे. दरम्यान, नागपूर विभागाच्या विशेष तपासणी मोहिमेत २००० हून अधिक प्रवासी विनातिकीट प्रवास करताना आढळले. त्यांच्याकडून १४ लाखांहून अधिक दंड वसूल करण्यात आला होता. ही मोहीम २७ एप्रिल २०२४ रोजी सुरू करण्यात आली होती.