नागपूर : राज्यात विजेची मागणी वाढल्याने अखंडित वीजपुरवठ्यासाठी महावितरणला महागडी वीज विकत घ्यावी लागत आहे. याचा अतिरिक्त भार आधीच ग्राहकांवर पडत असताना आता नागपूर महापालिकेने ‘सी-२०’ परिषदेच्या निमित्ताने केलेल्या रोषणाईमुळे महिन्याला १.८५ लाख युनिट वीज जळत आहे.

‘सी-२०’ परिषद आटोपून बरेच आठवडे उलटल्यावरही रोषणाई कायमच आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पथदिव्यांचा वीज वापर मे-२०२२ मध्ये २० लाख २२ हजार युनिट होता. रोषणाई केल्यानंतर म्हणजे मे २०२३ मध्ये हा वापर २२ लाख ८ हजार युनिट नोंदवला गेला. तो गेल्यावर्षीच्या मे महिन्याच्या तुलनेत १ लाख ८५ हजार युनिटने जास्त आहे. या जास्त वीज वापराला ‘सी-२०’च्या रोषणाईसाठी लावलेल्या पथदिव्यांवरील गोल आकारातील सिंबाॅल, सेल्फी पाॅईंट, सौंदर्यीकरणाशी संबंधित विविध उपक्रम, जनजागृतीपर फलक कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महापालिकेकडून नागरिकांना वीज बचतीसाठी केल्या जाणाऱ्या आवाहनावरच प्रश्न उपस्थित झाला आहे.

During the blockade gold and silver worth six crores were seized Pune news
नाकाबंदीत पावणेसहा कोटींचे सोने, चांदी जप्त; ओैंध परिसरात कारवाई
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Mumbaikars contribution in mutual funds
म्युच्युअल फंडात मुंबईचाच सिंहाचा वाटा; १७.८३ लाख कोटींचे योगदान; मुंबईसह महाराष्ट्राच्या तुलनेत अन्य राज्यांत वाढती दरी
Preventive action, maharashtra vidhan sabha elections 2024, Preventive action five districts maharashtra,
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाच जिल्ह्यांतील ३४ हजार सराइतांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई
Loksatta explained The quality of coal in power generation plants is deteriorating
विश्लेषण: वीजनिर्मिती प्रकल्पातील कोळशाचा दर्जा खालावतो आहे?
tigress Bijli walking with three cubs
Video: ताडोबात ‘बिजली’ची डौलदार चाल…हिरव्या रानवाटेवर बछड्यांसह…
Estimated tax evasion of 25 thousand crores 18 thousand fake companies busted by GST authorities print eco news
तब्बल २५ हजार कोटींच्या कर-चोरीचा अंदाज; जीएसटी अधिकाऱ्यांकडून १८ हजार बनावट कंपन्यांचा छडा
Acme Solar initial unit sale at Rs 275 to Rs 289 each
ॲक्मे सोलरची प्रत्येकी २७५ ते २८९ रुपयांना प्रारंभिक भागविक्री; निवा बुपा ‘आयपीओ’द्वारे २,२०० कोटी उभारणार!

हेही वाचा – ‘बीआरएस’ महाराष्ट्रात सर्व निवडणुका लढवणार; सत्ता आल्यास तेलंगणातील कृषी प्रारूप- के. चंद्रशेखर राव

विशेष म्हणजे, उन्हाळ्यात विजेची वाढती मागणी बघत महावितरणने राज्यभरातील ग्राहकांना अखंडित वीजपुरवठ्यासाठी तब्बल १ हजार ३४० दशलक्ष युनिट महागडी वीज खरेदी केली. या विजेसाठी प्रतियुनिट सुमारे ६.०१ रुपये मोजण्यात आले.

सिव्हिल लाईन्स, काँग्रेसनगरमध्य सर्वाधिक वीज वापर

सर्वाधिक वीज वापर सिव्हिल लाईन्स आणि काँग्रेसनगर या दोन विभागांत नोंदवला गेला. ‘सी-२०’ उपक्रमासाठी सर्वाधिक रोषणाई या दोनच विभागांत करण्यात आली आहे. सिव्हिल लाईन्स विभागात मे २०२२ मध्ये पथदिव्यांवरील वीज वापर ५.६० लाख युनिट तर मे २०२३ मध्ये हा वापर ६.३० लाख युनिट होता. येथे ७० हजार युनिट वीज वापर वाढला. काँग्रेसनगर विभागात मे २०२२ मध्ये वीज वापर ४.०६ लाख युनिट तर मे २०२३ मध्ये ४.६३ लाख युनिट होता. हा वापर ५७ हजार युनिटने वाढला.

हेही वाचा – बुलढाणा: समृद्धी महामार्गावर डिझेल चोरी! गस्त पथकाने…

‘सी २०’ परिषदेत देश- विदेशातील पाहुणे सहभागी झाले. या काळात शहर रोषणाईने सजवण्यात आल्याने विजेचा वापर वाढला. आताही नागपूरकरांसह पर्यटक या सुंदर रोषणाईचा आनंद घेत आहेत. त्यामुळे विजेचा अनावश्यक वापर होतो, असे म्हणणे योग्य नाही. – ए.एस. मानकर, सहाय्यक अभियंता, नागपूर महापालिका.