नागपूर: दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोग (एनटीडी) जगातील पाण्याची सुरक्षा, स्वच्छता आणि आरोग्य सेवा कमकुवत असलेल्या गरीब प्रदेशांत आढळतात. जगातील १ अब्जाहून जास्त नागरिकांना हा रोग प्रभावित करताे. ३० जानेवारीला जागतिक दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोग दिन असून त्यानिमित्त घेतलेला हा आढावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ट्राॅपिकल न्यूरोलाॅजी स्पेशॅलिटी ग्रुपचे अध्यक्ष आणि वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलाॅजी संघटनेचे विश्वस्त डॉ. चंद्रशेखर मेश्राम म्हणाले, हा रोग मुख्यत: विषाणू, जीवाणू परजीवी, बुरशी आणि विषांसह विविध रोगजनकांमुळे होतात. या आजारात डेंग्यू, चिकुनगुनिया, ड्रॅकनकुलियासिस, इकिनोकोकोसिस, मानवी आफ्रिकन ट्रीपॅनोसोमियासिस (झोपेचा आजार), लेशमॅनियासिस, कुष्ठरोग, हत्तीरोग, ऑन्कोसेरसियासिस, रेबीस, खरूज, सिस्टोसोमियासीस इत्यादी रोगांचा समावेश आहे. काही रोग जगाच्या काही प्रदेशात स्थानिक आहे. हे रोग दुर्लक्षित असल्याने जागतिक आरोग्य कार्यक्रमात त्यांना स्थानही नाही. शैक्षणिक आणि व्यवसायिक संधीने दुर्लक्षित गरीब लोकांचे हे आजार असून या सगळ्यांना गरीबीतून बाहेर काढल्यावर या आजारांवर नियंत्रण शक्य आहे. त्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज असल्याचेही डॉ. मेश्राम म्हणाले.

हेही वाचा – “भाजपा कधीच वेगळा विदर्भ करणार नाही,” ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा; म्हणाले…

न्यूरोसिस्टीसरकोसिसचा वर्षाला ५० लाख नागरिकांना संसर्ग

न्यूरोसिस्टीसरकोसिस हा आजार टेनिया सोलियम किंवा फीत जंतांच्या अळ्यांपासून होतो. मेंदूमध्ये या अळ्या जाणे हे मिरगीचे महत्वाचे कारण आहे. लॅटिन अमेरिका, दक्षिण पूर्व आशिया आणि आफ्रिकेत हा आजार सर्वाधिक आढळतो. दरवर्षी जगात ५० लाख लोकांना हा संसर्ग होतो. त्यापैकी ५० हजार लोकांचा मृत्यू होतो. जिथे डुकराची संख्या जास्त असते अश्या गाव खेड्यात या आजाराचे प्रमाण अधिक आहे. डुक्कर- मानवी चक्राद्वारे हे संक्रमण होते. उघड्यावरील शौचामुळे ही विष्ठा डुकराने खाल्ल्याने ताच्या मासपेशीत सिस्टिक लारवे जमा होतात. या डुकरांचे मास मनुष्याने खाल्ल्यास त्याला पोटात फीत जंत होतात. फीत जंताचे अंडे रक्ताद्वारे मेंदूमध्ये, डोळ्यामध्ये, त्वचेमध्ये मासपेशींमध्ये आणि इतर अवयवांमध्ये जमा होऊन सिस्टीरकोसिस होतो, असेही डॉ. मेश्राम यांनी सांगितले.

हेही वाचा – अकोला : थकबाकीचा डोंगर! पाणीपुरवठा योजनांची केवळ नऊ टक्के वसुली

देशात पंजाब, उत्तर प्रदेशात सर्वाधिक न्यूरोसिस्टीसरकोसिसग्रस्त

भारतात न्यूरोसिस्टीसरकोसिसशी संबंधित सक्रिय अपस्मार प्रकरणांची संख्या १० लाखांहून अधिक आहे. पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार आणि ओरिसामध्ये या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. पंजाबसारख्या डुकराचे मांस खाणाऱ्या राज्यांमध्ये सिस्टिसरकोसिसचे अधिक रुग्ण आहेत. देशातील सर्व खेड्यात शौचालय तयार झाले आणि डुकराचे मास ना खाण्यावर जनजागरण केले तर या रोगावर नियंत्रण मिळू शकेल, असेही डॉ. मेश्राम म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 1 billion citizens affected by neglected tropical diseases mnb 82 ssb
Show comments