‘समृद्धी’ महामार्गावर अतिवेग हा अनेक वाहनचालकांसाठी जीवघेणा ठरू लागला असून रविवारी मोगरा-धोत्रा गावानजीक भरधाव कार दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात १ जण ठार, तर कारमधील तिघे जखमी झाले. अपघातग्रस्त कारमधील प्रवासी हे रायपूर येथून शिर्डीला जात होते. दिनेश दौलत पंजवाणी (३७, रायपूर) असे मृताचे नाव आहे. वाहन तेच चालवत होते. या अपघातात मनीष पंजवाणी (३३), प्रदीप चांदवाणी (४५) आणि विकास जानवाणी (२३, सर्व रा. रायपूर) हे जखमी झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा- ‘भक्तांच्या आड का लपता, धमक असेल तर नागपुरात या’; प्राध्यापक मानव यांचे धीरेंद्र कृष्ण महाराजांना पुन्हा आव्हान

हे चौघेही जण शनिवारी रात्री ९ वाजता सीजी ०४ / एनके ७५०० क्रमांकाच्या वाहनाने शिर्डी येथे दर्शनासाठी निघाले होते. समृद्धी महामार्गावर १२३ चेनगेट दरम्यान मोगरा-धोत्रा गावानजीक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला, त्यात दिनेश यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तिघे किरकोळ जखमी असल्याने त्यसंना नांदगाव खडेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. दिनेश पंजवाणी यांचे पार्थिव रायपूर येथे पाठवण्याची व्यवस्था चांदूर रेल्वे येथील सिंध मंडळाने केली.