चंद्रपूर : शहरात परवानगीशिवाय वृक्षतोड केल्यास कारवाई होणार असून विनापरवानगी वृक्षतोड करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच १ लाख दंड ठोठावण्यात येणार आहे. वृक्ष आणि पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने चंद्रपूर महानगरपालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वृक्षांमुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो. त्यामुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबवण्यासाठी वृक्षतोड थांबणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे नवीन वृक्षारोपण करण्यासोबतच वृक्षतोड थांबवण्याकडेही विशेष लक्ष दिले गेले पाहिजे. त्यामुळे अत्यावश्यक कारणासाठी जरी एखाद्या झाडाला तोडायचे असले तरी त्यासाठी महापालिका आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असणाऱ्या वृक्ष प्राधिकरणाची रितसर परवानगी घेणे आवश्यक असते.

हेही वाचा – ‘कुनो’तील जागा चित्त्यांसाठी अपुरी; दोन मृत्यूंचे प्रमुख कारण

महाराष्ट्र वृक्ष संरक्षण व संवर्धन (शहरी विभाग) कायदा, १९७५ नुसार राज्याच्या नागरी भागात ५० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या वृक्षांना हेरिटेज ट्री असे संबोधून त्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यात येते. या कायद्यानुसार विनापरवानगी वृक्षतोड केल्यास गुन्हा दाखल करणे व १ लाखापर्यंत दंड आकारण्याची तरतूद आहे.

हेही वाचा – ‘कुनो’तील जागा चित्त्यांसाठी अपुरी; दोन मृत्यूंचे प्रमुख कारण

झाडांचे महत्त्व

शहरात वृक्षांची अत्यंत आवश्यकता आहे, चंद्रपूर शहरात तर तापमान नवे उच्चांक गाठत असते. अशा परिस्थितीत झाडांचे महत्त्व ओळखणे आवश्यक आहे. झाडे तापमान नियंत्रित करून एखाद्या भागाचे तापमान १ ते ५ अंशांपर्यंत कमी करू शकते. झाडे मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साइड शोषून घेऊन ऑक्सिजन देत असते. प्रत्येक झाड हे पाणी जमिनीत पोहोचवते. यामुळे भूगर्भाची पाणीपातळी वाढते. झाड हे पाणीसाठासुद्धा करते, यामुळे दुष्काळाची शक्यता कमी होते. झाडांमुळे मोठ्या प्रमाणात पाणी नाल्यात जाण्यापासून रोखल्या जाऊन पुरापासून वाचता येते. झाडे प्रदूषित हवा शुद्ध करून फुप्फुसाचा बचाव करतात. योग्य ठिकाणी झाडे लावल्यास थंड हवा देणाऱ्या यंत्रांची गरज कमी होते व झाडामुळे ध्वनी प्रदूषणसुद्धा कमी होते. त्याचप्रमाणे झाडे मातीतील विषारी पदार्थसुद्धा शोषून घेतात, अशा विविध पद्धतीने झाड हे मानवासाठी उपयुक्त आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 1 lakh fine and case will be filed if tree cut without permission in chandrapur rsj 74 ssb
Show comments