नायलॉन मांजावर अंकुश लावण्यात प्रशासनाला आलेले अपयश माणसांचाच नाही तर पक्ष्यांचा देखील बळी घेत आहे. मकरसंक्रांतीच्या सुरुवातीलाच उपराजधानीत दोन बळी गेले आणि काही जखमी देखील झाले. तीच पुनरावृत्ती पक्ष्यांबाबतही झाली असून मकरसंक्रांतीच्या पहिल्याच दिवशी सेमिनरी हिल्सवरील ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट’ केंद्रात कबूतर, होरी, घुबड, वटवाघूळ, बगळा, रात ढोकरी, वेडा राघूसह सुमारे दहा जखमी पक्ष्यांना उपचारासाठी आणण्यात आले.

हेही वाचा- नागपूर : गोरेवाडा प्राणिसंग्रहालयात मादी बिबटं मृतावस्थेत

Farmer killed in tiger attack
वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Nagpur Kolkata bomb threat
आकाशात झेपावलेल्या विमानात बॉम्ब ठेवल्याचा फोन अन्…
Panje Dongri wetlands, Uran, dry
उरण : आंतरभरती प्रवाह बंद झाल्याने पाणजे पाणथळ कोरडी
stray dogs dead
कांदिवलीमध्ये १४ भटक्या कुत्र्यांचे मृतदेह
bird was happy to see the little girl
चिमुकलीला पाहून पक्षी झाला खूश; एकमेकांची करू लागले नक्कल अन् … पाहा खेळकर पक्ष्याचा VIRAL VIDEO
majority of bird species in india face decline
देशातील पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट; जाणून घ्या, मानवी चुका किती हानीकारक

मकरसंक्रांत म्हणजे नात्यातील गोडवा वाढवण्याचा सण. रंगीत पतंगांनी आकाशात गेलेली गर्दी न्याहाळण्याचा क्षण, पण गेल्या काही वर्षात नायलॉन मांजामुळे या सणाला आणि पतंगांच्या आनंदाला गालबोट लागले आहे. मांजामुळे अनेकांचा बळी जात असून त्याचा सर्वाधिक फटका पक्ष्यांनाही बसत आहे. शहरात दरवर्षी शेकडो पक्षी या मांजामुळे जखमी होत आहेत. दरवर्षी सेमिनरी हिल्सवरील ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट’ केंद्रात त्यांच्यावर उपचार करून त्यांना नैसर्गिक अधिवासात मुक्त केले जाते. गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यान काही पक्ष्यांचा मृत्यूदेखील होत आहे. दरम्यान, यावर्षीपासून विद्यार्थ्यांमार्फत लोकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून उपवनसंरक्षक डॉ. भारत सिंह हाडा यांच्या संकल्पनेतून जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे.

हेही वाचा- नागपूर शिक्षक मतदारसंघात बहुरंगी लढत; २२ उमेदवार रिंगणात, पाच उमेदवारांचे अर्ज मागे

विविध शाळा, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट’ केंद्रात बोलावून नायलॉन मांजामुळे पक्ष्यांची होणारी अवस्था त्यांना प्रत्यक्षात दाखवून नायलॉन मांजा न वापरण्याचे धडे दिले जात आहेत. मुलांच्या माध्यमातून समाजात जनजागृती व्हावी हा उद्देश समोर ठेवून हा उपक्रम सुरू केला आहे. यासाठी सहाय्यक वनसंरक्षक सुरेंद्र काळे, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रतिभा रामटेके मार्गदर्शन करत आहे. सोबतच विद्यार्थ्यांना पक्ष्यांबद्दल व त्यांच्यावरील उपचारावर ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट’ केंद्रात किती मेहनत घेतली जात आहे, याची माहिती कुंदन हाते, डॉ. सुदर्शन काकडे, पंकज थोरात, व्यंकटेश मुदलीयर व संपूर्ण ‘ट्रान्झिट’ची चमू देत आहे.

हेही वाचा- मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची फरफट; परीक्षेच्या तोंडावर पुस्तकांपासून वंचित

या उपक्रमात शहरातील ज्या शाळा, महाविद्यालयांना सहभागी व्हायचे आहे, त्यांनी ९८२२७३७८०६, ९४२२८०३५१७, ८८०५०१९०५१ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन वनखात्याने केले आहे.