लोकसत्‍ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमरावती : पोलीस आयुक्‍तालयाच्‍या हद्दीत नोव्‍हेंबर महिन्‍यात राबविण्‍यात आलेल्‍या ‘ऑपरेशन मुस्‍कान’ अंतर्गत ९ मुली आणि १ मुलगा अशा दहा अल्‍पवयीन मुलांचा शोध घेत या मुलांना पालकांच्या ताब्यात देण्‍यात आले आहे. विशेष म्हणजे शोधलेल्या मुलांमध्ये पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद नाही अशीही काही मुले, मुली आहेत.

पोलीस आयुक्‍त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस उपायुक्‍त सागर पाटील यांच्‍या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक रिता उईके यांच्‍या नेतृत्‍वात १ ते ३० नोव्‍हेंबरपर्यंत अमरावती पोलीस आयुक्‍तालयाच्‍या हद्दीत ‘ऑपरेशन मुस्‍कान-१२’ ही मोहीम राबविण्‍यात आली. या मोहिमेअंतर्गत पोलीस ठाण्‍यात कोणतीही नोंद नाही, अशा ५ मुलांचा शोध घेण्‍यात आला. बालकांना बाल कल्‍याण समितीशी समन्‍वय साधून सुखरूप त्‍यांच्‍या पालकांच्‍या स्‍वाधीन करण्‍यात आले आहे.

आणखी वाचा-‘अमरावती-पुणे-अमरावती’ एसटीसाठी ठरले लाभदायी; १८२ फेऱ्यांमधून ३८ लाखांचे उत्‍पन्न

हरवलेल्या मुलांची त्यांच्या पालकांशी भेट घडवून देण्याचे काम पोलिसांसाठी आव्हानात्मक असते. मुला-मुलींना पळवून त्यांना भीक मागण्यापासून ते अगदी देहविक्रयाच्या व्यवसायात ढकलले जाते. ‘ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत शून्य ते १८ वयोगटातील हरवलेल्या मुलांचा शोध घेण्‍यात येतो.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 10 children safe due to operation muskan mma 73 mrj
Show comments