वर्धा : जमनालाल बजाज संस्थेची दुर्बल शाळांना दहा कोटींची मदत मिळाली आहे. या संस्थेने जिल्ह्यातील दुर्लक्षित पण गुणवंत शाळांना मदत करण्याचा उपक्रम राबविणे सुरू केले आहे. गत तीन वर्षांत जिल्ह्यातील विविध शाळांना आतापर्यंत दहा कोटी रुपयाची मदत करण्यात आली असून यावर्षी साठ लाख रुपयांची मदत करण्याचे नियोजन असल्याचे संस्था सचिव संजय भार्गव यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ई-लर्निंग उपकरणे, वर्गखोल्या बांधकाम व दुरुस्ती तसेच सुधारीत अध्यापन प्रक्रियेस मदत करण्याचे काम या देणगीतून झाले आहे. गत तीन वर्षांपासून संस्थेने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांवर लक्ष केंद्रित केले आहे. संस्थेच्या शाळा महाविद्यालयाचे शिक्षक व प्राध्यापक विविध शाळांना महिन्यातून किमान एकदा भेट देतात. तसेच विद्यार्थ्यांसाठी निवासी शिबिरे आयोजित करीत विविध उपक्रमांना चालना दिल्या जाते. विद्यार्थ्यांचे भविष्यातील मार्ग हे माध्यमिक शाळेतच ठरतात. म्हणून चांगल्या माध्यमिक शाळांना प्रोत्साहन देण्याची भूमिका संस्थेने ठेवली आहे.

हेही वाचा – नागपूर : पोलिसांनी दिली पावणेचार कोटींची दिवाळी भेट, नागरिकांच्या चेहऱ्यावर फुलला आनंद

हेही वाचा – अकोला : …तर खासगी बस वाहतूकदारांवर कारवाई, ‘या’ माध्यमातून केलेल्या तक्रारीची थेट दखल घेणार

यावर्षी जिल्ह्यातील बारा शाळांची निवड करण्यात आली आहे. या शाळांवर साठ लाख रुपये खर्च करून संगणक, विज्ञान प्रयोगशाळा व काही नागरी कामे केली जाणार आहेत. जमनालाल बजाज यांच्या जयंती निमित्ताने बारा शाळांना २९ संगणक भेट देण्यात आले. हाच कार्यक्रम इतर पात्र असणाऱ्या माध्यमिक शाळांमध्ये राबविण्याचा मानस संस्थेने ठेवला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 10 crores help from jamnalal bajaj institute to weak schools pmd 64 ssb
Show comments