बुलढाणा : मलकापूरनजीकच्या कुंड येथील १० बालकांनी विषारी बिया खाल्याने त्यांची प्रकृती बिघडली. मलकापूर येथे प्राथमिक उपचारानंतर त्यांना बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार, बालकांनी जट्रोफा नावाच्या वनस्पतीची फळे व बिया खाल्ल्या. यामुळे १० मुलांना मळमळ, उलटी व हागवणीचा त्रास सुरू झाला. त्यांना मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.
हेही वाचा >>> पंतप्रधान मोदी यांचा पकोडे तळून निषेध, जळगावात युवक काँग्रेसतर्फे अनोखे आंदोलन
डॉक्टर मितेश टावरी यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचाराकरता बुलढाणा येथील जिल्हा रुग्णालयात पाठविले. सोहम निना तायडे (१०), दिव्या संतोष काऺडेलकर (१०), भाग्यश्री श्रीकृष्ण काऺडेलकर (१२), रिया सुरेश बावस्कर (६), नम्रता सुरेश बावस्कर (८), वैष्णवी रमेश बावस्कर (१०), श्रेयश अशोक काऺडेलकर (५), दिव्या कांडेलकर (१०), श्रेया रमेश बावस्कर (५) आणि समर्थ सुरेश बावस्कर (अडीच वर्षे), अशी उपचार सुरू असलेल्या मुलांची नावे आहेत.