बुलढाणा: जिल्ह्यातील मलकापूर नजीकच्या राष्ट्रीय महामार्ग ६ वर झालेल्या विचित्र वाहन अपघातात १० प्रवासी जखमी झाले. यातील तीन प्रवाशांची प्रकृती गंभीर असून त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आज ८ सप्टेंबरला संध्याकाळी ही दुर्घटना घडली. एक काळी पिवळी जीप नांदुरा वरून मलकापूर कडे येत होती व ट्रकसुद्धा मलकापूर कडे येत होता. अचानक ट्रकच्या पुढे काही मोकाट गुरे आली. गुरांना वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रक एका बाजूला झुकला. त्याच वेळी काळी पिवळी ट्रकच्या खाली दबली. आजूबाजूच्या नागरिकानी प्रवाशांना बाहेर काढत मलकापूर उपजिल्हा रुग्णाल्यात भरती केले. दहा जण जखमी झाले असून तिघांची प्रकृती गंभीर आहे.
हेही वाचा… आरोपींना ‘व्हीआयपी ट्रीटमेंट’ देणारा पीएसआय राठोड निलंबित
मुंबई ते कलकत्ता हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ जिल्ह्यातून जात असून या मार्गावर प्रचंड वाहतूक असते. या अर्धवट रस्त्याचे नुकतेच गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण झाले आहे. रस्त्याच्या आजूबाजूला जाळ्या लावल्या नसल्याने रस्त्यावर मोकाट गुरे फिरतात. कुठलीच सुरक्षा व्यवस्था नसल्याने चालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.