नागपूर : दहावी आणि बारावी परीक्षेत पाल्यांना अधिकाधिक गुण मिळावावे, असे पालकांना वाटते आणि त्याचे दपडपण पाल्यांवर असते. त्यातून अनेकदा मुलांना नैराश्य येते. परीक्षेच्या काळात ते तणावात असतात. काही जण तर टोकाचे पाऊल उचलतात. पण येथे विचित्र प्रकार घडला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

छत्तीगडच्या डोंगरगड येथील एका दहावीतील मुलाने घरातून पळ काढून रेल्वे स्थानक गाठले आणि मिळेल त्या गाडीत बसला. तो थेट नागपुरात पोहोचला. त्याचे आई-वडील व्यावसायिक आहेत. तो वर्गात नेहमीच अव्वल राहायचा. त्यामुळे तो दहावीतही अव्वल राहणार, अशी अपेक्षा पालकांकडून होती. मात्र, तो अभ्यासामुळे तणावात राहू लागला. परीक्षेच्या पहिल्या पेपरच्या दिवशीच तो घरून पळाला. बराच वेळ होऊनही तो घरी परतला नसल्याने चिंतित पालकांनी राजनांदगाव पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली.

हेही वाचा – होळी सणावर महागाईचा भस्मासूर; पिचकारी, रंग, गुलालाच्या दरात ३० टक्क्यांनी वाढ, खरेदीदारांमध्ये निरुत्साह

हेही वाचा – ‘बॉयफ्रेंड’वरून तरुणींमध्ये फ्रिस्टाईल; उद्यानातील ‘कॅट फाईट’ची शहरभर चर्चा

मुलाकडे मोबाईल होता. त्यामुळे पोलिसांनी त्याचे लोकेशन मिळविले. तो नागपूर स्थानकावर असल्याचे लक्षात आले. लगेच तेथील पोलिसांनी नागपूर लोहमार्ग पोलिसांना सूचना दिली. लोहमार्ग पोलिसांना तो फलाट क्रमांक ३ वर आढळून आला. तो तणावात होता. त्याचे पोलिसांनी समुपदेशन केले. नंतर त्याच्या पालकांना सूचना देण्यात आली. समुपदेशानंतर तो घरी जायला तयार झाला. त्याला त्याच्या भावाच्या स्वाधीन करण्यात आले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 10 th class boy from dongargad in chhattigarh ran away from home due to fear of exam reach nagpur rbt 74 ssb