लोकसत्ता टीम

अकोला : महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई-नागपूरदरम्यान विशेष रेल्वेच्या १० अनारक्षित फेऱ्या चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. त्यामुळे अतिरिक्त गर्दीवर नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे.

readers comments on Loksatta editorial
लोकमानस : रेल्वे आता सेवा नव्हे उद्योग
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
dilapidated railway bridge on Nagpur Chhindwara route will be opened
नागपूर – छिंदवाडा मार्गावरील खचलेला रेल्वे पुला सुरू होणार,मुहूर्त ठरला
Nagpur to Sikandarbad Vande Bharat Express coaches to be reduced
नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेसला अल्प प्रतिसाद,डबे कमी होणार
Rajewadi Station , Purandar Airport ,
पुणे : राजेवाडी स्थानकापासून पुरंदर विमानतळापर्यंत रेल्वे मार्गिका, एकात्मिक वाहतूक आराखड्यात प्रकल्प प्रस्तावित
central railway cancelled 400 local trains
मध्य रेल्वेचा बोजवारा, सहा दिवसांत ४०० लोकल रद्द; ६५० लोकल विलंबाने
pune metro new routes
Pune Metro: पुण्यातील वाहतूक खोळंब्यावर १,२६,४८९ कोटींचा तोडगा; जिल्हा नियोजन समितीत CMP सादर!
train cancellations on western railway due to mega block
वाणगाव ते डहाणू रोडदरम्यान ब्लॉक; पश्चिम रेल्वेवरील काही रेल्वेगाड्या रद्द

नागपूर-मुंबई अनारक्षित विशेष रेल्वे गाडीच्या तीन फेऱ्या होणार आहेत. ०१२६२ क्रमांकाची विशेष गाडी ४ डिसेंबर रोजी नागपूर येथून २३.५५ वाजता निघेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईला दुसऱ्या दिवशी १५.३० वाजता पोहोचेल. ०१२६४ क्रमांकाची गाडी ५ डिसेंबर नागपूर येथून ०८.०० वाजता निघेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे त्याच दिवशी २३.४५ वाजता पोहोचेल. ०१२६६ क्रमांकाची गाडी ५ डिसेंबरला नागपूर येथून १५.५० वाजता निघेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी १०.५५ वाजता पोहोचेल. या गाडीला नागपूर, अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, जलंब, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कसारा, कल्याण, दादर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे थांबा राहणार आहे.

आणखी वाचा-“गृहखात्यावर कोणाचेही नियंत्रण नाही,” विजय वडेट्टीवार असे का म्हणाले? वाचा…

मुंबई/दादर ते सेवाग्राम/अजनी/नागपूर अनारक्षित विशेष गाडीच्या सहा फेऱ्या चालविण्यात येणार आहे. ०१२४९ विशेष गाडी ६ डिसेंबरला १६.४५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून निघेल आणि अजनी येथे दुसऱ्या दिवशी ०९.३० पोहोचेल. ०१२५१ क्रमांकाची गाडी ६ डिसेंबरला १८.३५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून निघेल आणि सेवाग्राम येथे दुसऱ्या दिवशी १०.३० वाजता पोहोचेल. ०१२५३ क्रमांकाची गाडी ७ डिसेंबरला दादर येथून ००.४० वाजता निघेल आणि अजनी येथे त्याच दिवशी १५.५५ वाजता पोहचणार आहे. ०१२५५ क्रमांकाची विशेष गाडी १२.३५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून निघेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ०३.०० वाजता पोहोचेल.

०१२५७ क्रमांकाची विशेष गाडी ८ डिसेंबरला १८.३५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून निघेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी १२.१० वाजता पोहोचेल. ०१२५९ क्रमांकाची गाडी ८ डिसेंबरला दादर येथून ००.४० निघेल आणि अजनी येथे त्याच दिवशी १५.५५ वाजता पोहोचेल. या गाडीला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, दादर, कल्याण, कसारा, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, जलंब, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा, सेवाग्राम, अजनी आणि नागपूर येथे थांबा राहील.

आणखी वाचा-बडनेरा ते वर्धा मार्गावर ३० रेल्‍वेगाड्या धावताहेत ताशी १३० किमी वेगाने

अजनी-मुंबई वन-वे अनारक्षित विशेष गाडीची एक फेरी होणार असून ०२०४० क्रमांकाची विशेष गाडी अजनी येथून दि. ७ डिसेंबरला १३.३० वाजता निघेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी ०४.१० वाजता पोहोचेल. या गाडीला अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, दादर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे थांबा राहील.

Story img Loader