एक भरधाव कार अनियंत्रित झाल्यामुळे एका घरात शिरली. या अपघातात घरात झोपलेला १० वर्षीय मुलाचा चिरडून मृत्यू झाला. हा अपघात गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत टीव्ही टॉवर आयबीएम रोडवर झाला.
हेही वाचा >>> पैशांसाठी अवैध संबंध ठेवून तरुणींकडून गर्भधारणा, प्रसूतीनंतर धनाढय़, निपुत्रिक दाम्पत्याला बाळाची विक्री
जॉर्डन ऊर्फ विक्की फिलीप जोसेफ असे मृत मुलाचे नाव आहे. शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता एक स्कॉर्पियो कार टीव्ही टॉवरकडून आयबीएम रोडवरून भरधाव जात होती. कारमध्ये दोन युवक होते. दरम्यान, चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार घरात शिरली. घरात झोपलेला १० वर्षीय मुलगा जॉर्डनचा चिरडून मृत्यू झाला. तर कारमधील दोन युवकही गंभीर जखमी झाले.