लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चंद्रपूर: राज्यात मागील तीन महिन्यांत १६ ते २५ वर्ष वयोगटातील ३ हजार ५९४ तरुणी बेपत्ता झाल्याची धक्कादायक बाब राज्य शासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातही मुलींच्या बेपत्ता होण्याची आकडेवारी चिंताजनक असून तीन महिन्यांत १०१ तरुणी बेपत्ता झाल्या आहेत. तरुणी बेपत्ता होण्यात अमदनगर, मुंबई, पुणे, पुणे ग्रामीण, नाशिक, पिपरी चिंचवड, कोल्हापूर, नागपूर, नागपूर शहर, मिरा भाईदर, जळगाव यानंतर चंद्रपूर १२ क्रमांकावर आहे.

राज्य सरकारच्या संकेतस्थळावर महिला व मुली बेपत्ता होण्याची असलेली आकडेवारी चिंताजनक असल्याची बाब राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केली होती. नोकरी, लग्न, प्रेमाचं आमिष दाखवून तरुणींचे लैंगिक शोषण केले जाते. परराज्यात तसेच देशाबाहेर तरुणीची विक्री करण्यात येते. यामुळे महिलांच्या बेपत्ता होण्याच्या तक्रारीला पोलिसांनी गांभीर्याने घेणे आवश्यक आहे.

हेही वाचा… दीक्षितांच्या मेट्रो प्रवासाला ‘ब्रेक’ कुणामुळे?

राज्यात बेपत्ता झालेल्या तरुणींची जिल्हानिहाय आकडेवारी

अहमदनगर १८४, अकोला ४१, अमरावती शहर ३१, अमरावती ग्रामीण ६३, औरंगाबाद शहर ६६, औरंगाबाद ग्रामीण ५२, बीड २७, भंडार २३, मुंबई शहर ३८३, बुलढाणा ७६, चंद्रपूर १०१, धुळे ४५, गडचिरोली १३, गोंदिया ४६, हिंगोली १४, जळगाव १२१, जालना ३६, कोल्हापूर १२७, लातूर ४२, मीरा- भाईंदर ११३, नागपूर शहर १०८, नागपूर ग्रामीण १६९, नांदेड ३६, नंदुरबार ३७, नाशिक शहर ९३, नाशिक ग्रामीण १६९, नवी मुंबई ७५, उस्मानाबाद ३४, पालघर २८, परभणी २७, पिंपरी चिंचवड १४३, पुणे शहर १४८ आणि पुणे ग्रामीण १५६ अशी बेपत्ता तरुणींची संख्या आहे. या सर्व बेपत्ता तरुणी १६ ते २५ वयोगटातील आहेत.

प्रेमप्रकरण व कौंटुबिक कलहामुळे पलायन!

तरूणीचे प्रेमप्रकरण असल्यास प्रेमप्रकरणामुळे तरूणी घरात कुणालाही काहीही न सांगता घरातून पळून जातात. तसेच घरात दररोज होणारे कौंटुबिक वाद व कलह यामुळे तरूणी घर सोडून निघून जात असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 101 girls and women missing in chandrapur district in three months rsj 74 dvr
Show comments