तातडीने बैठक लावण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या उद्याेग निरीक्षक परीक्षेत राज्यातून १०२ उमेदवार उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण होऊन तीन महिन्यांचा कालावधी लोटूनही या उमेदवारांना अद्याप नियुक्ती देण्यात आलेली नाही. या उमेदवारांना अस्थायी नियुक्ती द्यावी, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली असून मुख्यमंत्र्यांनी तत्काळ दखल घेत बैठक लावण्याचे निर्देश दिले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल २८ डिसेंबर २०२२ रोजी जाहीर झाला आहे. यात १०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांची उद्योग निरीक्षक गट-क या पदावर निवड झाली आहे. मात्र, या उमेदवारांना अद्यापही नियुक्ती आदेश प्राप्त झालेले नाही. नियुक्ती प्राधिकरण उद्योग संचालनालयात उमेदवार सतत संपर्क साधत नियुक्ती आदेश लवकर देण्यासंदर्भात मागणी करत आहे. मात्र कागदपत्रे पुनःतपासणी सुरू आहे, असे कारण संबंधित अधिकाऱ्यांकडून दिले जात आहे. परिणामी नियुक्ती आदेश देण्यास विलंब होत आहे. स्पर्धा परीक्षेची दिवसरात्र तयारी करून अंतिम यादीत निवड झाल्यानंतरही त्यांना नियुक्तीचे आदेश प्राप्त होत नसल्याने उमेदवारांमध्ये नैराश्याचे वातावरण आहे.

three days holiday to all schools
निवडणुकीमुळे राज्यातील शाळांना तीन दिवस सुटी? शिक्षण विभागाच्या सूचना काय?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
special fund of 20 lakhs each to all departmental offices of Mumbai Municipal Corporation
सुविधांसाठी पालिकेचे पाच कोटी, पालिकेच्या सर्व विभाग कार्यालयांना प्रत्येकी २० लाखांचा विशेष निधी
How is census of population conducted
जनगणना कशी होते? प्रगणकांना कोणते अनुभव येतात?
Mega Housing Lottery application process, entension, CIDCO
सिडकोच्या २६ हजारांच्या महागृहनिर्माण सोडत प्रक्रियेला महिन्याभराची मुदतवाढ
massive protest by uppsc aspirants over exam dates
उत्तर प्रदेशात ‘यूपीपीएससी’ परीक्षार्थींची निदर्शने; दोन परीक्षा एकाच दिवशी घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन
Municipal corporation Thane, illegal hoarding holders Thane, illegal hoarding Thane,
ठाण्यात ५२ बेकायदा होर्डिंगधारकांना पालिकेच्या नोटीसा, १० कोटी ९६ लाखांचा दंड पालिका करणार वसूल

उद्योग निरीक्षक पदावर निवड झालेल्या उमेदवारांचा आपण सहानुभूतीपूर्वक विचार करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेतून अन्य गट-क पदावर निवड झालेल्या उमेदवारांना देण्यात येणाऱ्या अस्थायी नियुक्तीप्रमाणेच यांनाही अस्थायी नियुक्ती देण्यात यावी, अशी मागणी आ. जोरगेवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. याची दखल घेत याबाबत तत्काळ बैठक लावण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी संबधित विभागाला दिले आहे.