चंद्रपूर : जिल्हाधिकाऱ्यांनी खनिज विकास निधीची बैठक वर्षभरापासून न घेतल्याने १०८० करोड रूपयांचे प्रस्ताव मंजूरीसाठी धुळखात पडले आहेत. तर ५५० करोड रूपयांचा निधी जमा आहे. हा निधी विनाकारण अडवून ठेवण्यात आल्याने जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदार संघातील कामे ठप्प आहेत. हा अखर्चित निधी तात्काळ खर्च करावा अशी मागणी आता जिल्ह्यातील आमदारांकडून होवू लागली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या औद्योगिक जिल्ह्यातील प्रमुख गौण खनिजांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त होतो. हा निधी खनिजांमुळे प्रत्यक्ष बाधित व इतर बाधित क्षेत्रांतील विकास कामांवर नियमीत खर्च झाला पाहिजे. जिल्हा खनिज प्रतिष्ठानद्वारे खनिज क्षेत्र कल्याण निधी अंतर्गत २०१९-२० मध्ये ४४४ कामांवर ११२.९७ करोड, २०२०-२१ मध्ये १२४२ कामांवर १७१.८५ करोड तर २०२१-२२ मध्ये २९४ कामांवर ६१.५३ करोड रुपये खर्च करण्यात आले. मात्र त्यानंतर २०२२-२३ व चालू वर्षी म्हणजेच २०२३-२४ मध्ये प्रत्यक्ष बाधीत व इतर बाधित क्षेत्रात खनिज विकास निधीतून एकाही विकास कामाला प्रशासकीय मंजूरी देण्यात आलेली नाही. जिल्हाधिकारी तथा समितीचे अध्यक्ष विनय गौडा यांच्याकडे खनिज विकास निधी अंतर्गत सद्यास्थितीत १०८० करोड रुपयांचे प्रस्ताव मंजूरीसाठी धूळ खात पडून आहेत तर सुमारे ५५० करोडचा निधी जमा आहे. हा निधी खनिज विकास निधीच्या दिशानिर्देशाप्रमाणे त्वरीत खर्च झाला पाहिजे. विविध खनिजांच्या प्रदूषणामुळे परिसरातील नागरीक मोठ्याा प्रमाणात बाधीत होत असतात, अशा स्थितीत हा निधी विनाकारण अडवून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे हा अन्याय असून खनिज विकास निधी तात्काळ दिला नाहीतर, वरोरा – भद्रावतीतील वाहतूक बंद करू असा इशारा आमदार प्रतिभा धानोरकर यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांना दिला. तात्काळ या निधीचे विकास कामाकरिता वितरण होणार असल्याची ग्वाही यावेळी जिल्हाधिकारी यांनी आमदार प्रतिभा धानोरकर यांना दिली. विशेष म्हणजे जिल्ह्यातील इतरही आमदारांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेवून खनिज विकास निधीचा मुद्दा लावून धरला आहे.

हेही वाचा >>>डॉ. भैरवी काळे यांना आकाशवाणीची ‘ए’ श्रेणी प्राप्त; विदर्भातील एकमेव…

खनिज विकास निधी खर्च करण्यासाठी आहे. मात्र गेल्या वर्षभरापासून हा निधी पडून असल्याने असंख्य कामे अडकलेली आहेत. याबाबत जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदार संघातील आमदारांनी यापूर्वीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा ब्रम्हपुरीचे आमदार यांनी तर अनेकदा पालकमंत्री पूर्वी खनिज विकास निधी समितीचे अध्यक्ष होते. मात्र आता पालकमंत्र्यांऐवजी जिल्हाधिकारी या समितीचे अध्यक्ष आहेत. त्यामुळेच पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार जिल्हाधिकाऱ्यांवर बैठक लावू नये यासाठी दबाव आणत असल्याचा आरोप वारंवार केला आहे. दरम्यान आता आमदार धानोरकर यांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर तरी निधी वितरीत करतात काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा >>>नागपुरातील मेडिकल रुग्णालयात अद्ययावत ८० खाटांचे ‘पेईंग वार्ड ‘; रुग्णांना अतिरिक्त पैसे देऊन सेवा मिळणार

एक लाख रूपये एकरी मदत द्या

नैसर्गिक पूरपरिस्थिती कमी उद्भवत असून वेकोलीमुळे कृत्रिम पूरपरीस्थितीती निर्माण होत आहे. त्यामुळे वेकोलिच्या ओव्हर बर्डनमुळे वरोरा – भद्रावती सह अन्य ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूरपरिस्थितीमुळे शेतपिक वाहून गेले आहे. शेतकऱ्यांचे यात आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे ओव्हर बर्डनमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेल्यांना १ लाख रुपये एकरी वेकोलिकडून मदत द्या तसेच पांदण रस्त्याकरिता ओव्हर बर्डन चे मटेरिअल वापरण्याची परवानगी द्या अशी लोकोपयोगी मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्याकडे केली आहे. आज जिल्हाधिकारी यांच्या दालनात बैठक घेतली. त्यावेळी विविध विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी भद्रावतीचे तहसीलदार अनिकेत सोनवणे देखील उपस्थित होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 1080 crore proposal of mineral development fund chandrapur rsj 74 amy